Sunday, October 1, 2023

गौराई


आज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बोलू जरा. आमच्या येण्याने तुम्हा बायकांना अगदी उसंत मिळत नाही. आमच्या तरी किती तर्‍हा. तुझ्याकडेच बघ एक येते श्रावणात शुक्रवारी आणि दुसरी भाद्रपदात. काही जणी सुगडावर, काही उभ्या, काही तांब्यावर, काही पानांवर तर काही खड्यांच्या अशा वेगवेगळया पद्धती. त्याबरोबरच ते साग्रसंगीत जेवण. पुरणपोळ्या, सोळा भाज्या, कोशिंबिरी, चटण्या आणि करंज्या, लाडू, अनारशासारखे फराळाचे पदार्थ. कदाचित हे पूर्वापार चालत आले किंवा या हवामानात सर्व भाज्या चांगल्या मिळतात किंवा सर्व रस आपल्या जेवणात असले तर ते स्वास्थ्यवर्धक असते म्हणून असावे. खरंतर सध्याच्या जमान्यात हे रुचकर पदार्थ योग्य पद्धतीने केले तर गप्पा मारायला आलेल्या मैत्रिणींना पटकन देता येतील म्हणून हे फराळाचे पदार्थ असावेत. या निमित्ताने तुम्हा मैत्रिणींना छान सजून एकमेकींकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारता येतात. पण बर्‍याच वेळा सर्वच गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. त्यामुळे तुम्हा बायकांची खूपच धावपळ होते. आपल्याला जमेल तसे मनोभावे करावे. 

बाकी तुझे Women networking कसे चालले आहे? महिला सक्षमीकरण झाले तर त्या समर्थपणे आणि सजगतेने जबाबदारी पेलू शकतात हा जी-२० परिषदेचा आणि तुझा अजेंडा सारखाच आहे की. त्यासाठी महिलांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-२० परिषदेने उचललेले पाऊल अगदी योग्यच वाटलं. 

शैक्षणिक प्रगती बरोबर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. अर्थात मुलगी शिकली की प्रगती होतेच पण निर्णय प्रक्रियेत जर महिलांचा सहभाग असेल तर सामाजिक विकास नक्कीच लवकर होऊ शकतो. मंगलयान, चांद्रयान आणि आदित्य एल 1 या सर्व अंतराळ मोहीमा यशस्वी करण्यासाठी स्त्री स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

सध्या जागतिक स्तरावर ज्या समस्यांना सामोरे जात आहोत त्यामध्ये हवामान बदल आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मध्ये जी-२० परिषदेमध्ये सुचविल्याप्रमाणे सायबर सुरक्षेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आणि ते राबविण्यात महिलांचा सहभाग असणे आवश्यकच आहे. तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जावीत यासाठी महिलांकडे नेतृत्व असणे गरजेचे वाटते. अगदी छोटसं उदाहरण घेतलं तर हे लक्षात येईल, घरात प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याचा निर्णय महिलांनी घेतला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे जगाला पटलेले असून समाजाच्या सर्व क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यासाठी नारीशक्ती नक्कीच प्रभावी ठरेल. सध्या फक्त १० टक्के महिला सक्रिय राजकारणात आहेत. महिलांनी राजकारणात यावे यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असं वाटतं. 

वित्तीय प्रणालीमध्ये महिलांच्या समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर असायला हवे. याची सुरुवात अगदी शाळेत असल्यापासून होऊ शकते. म्हणूनच आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून गुंतवणूक करणार्‍या तुझ्या मुलीचे खरंच कौतुक वाटलं. "आई मी घेतलेला शेयर ११० टक्के वाढला, अजून घ्यायला हवे होते. क्रिकेट वर्ल्ड कप भारतात आहे तेव्हा हॉटेल किंवा ऑन लाईन फूड डिलिव्हरी शेयरच्या किमती वाढू शकतील का?" अशी तुमची चर्चा ऐकून छान वाटलं. 

अष्टावधानी असावे हे म्हणणे सोपे आहे पण निभावून नेणे तेवढेच अवघड . वेगवेगळया आघाड्यांवर लढताना ताणतणावांकडे, लक्ष द्यायलाच हवे. यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकडे मात्र तुम्ही बायका दुर्लक्ष करता. आहार, विहार आणि शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक स्वास्थ्य तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. स्वतःसाठी वेळ दे, स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष दे व एखादा छंद जोपास. 

निरोगी व सुखासमाधानात रहा हाच आमचा शुभाशीर्वाद !!! 


सौ. स्नेहल कमलापूर


Read More

Friday, August 18, 2023

मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी

 



स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या पगाराचे प्रत्येकाकडून पत्र घेऊन घर घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून बॅंकेत निवेदन देणारी एक कष्टकरी महिला. एकीने घरच्या जबाबदाऱ्यासाठी नोकरी सोडली तर दुसरीने नोकरी करून घरची जबाबदारी घेतली. त्याचवेळी डोळ्यासमोर आलं ते विद्या बाळ आणि मेधा राजहंस यांनी संपादित केलेलं "मिळवतीची पोतडी" हे पुस्तक. 

या  पुस्तकाच्या प्रस्तावनेत विद्या बाळ म्हणतात, "पोतडी आणि अलिबाबाची गुहा उघडली की काय बाहेर येईल सांगता येत नाही". खरंच "मिळवतीची पोतडी" तून बाहेर पडतात ते अनुभवाचे बोल. 

मिळवती म्हणजे पैसा मिळवणारी असा खरंतर मर्यादित अर्थ. तो तसाच असावा का असाही प्रश्न पडतोच. 

अचानक मोहन गोखले हे जग सोडून गेल्यावर सुन्न झालेल्या स्वतःशीच लढून जिंकलेल्या शुभांगी गोखले. 
नोकरी, लेखन व अभिवाचन करून सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकरांची मुलगी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची आई याशिवाय वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वीणा देव. 
मजा म्हणून लॅक्मे साबणाचे मार्केटिंग, वर्तमानपत्रातील लिखाण व त्यानंतरची शिक्षण क्षेत्रातील नोकरी सोडून वर्ल्ड बँक प्रोजेक्टवर काम करताना शिक्षण क्षेत्रातील संलग्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगल्भ अनुभव असणाऱ्या व प्रकाश जावडेकरांची पत्नी याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्राची जावडेकर. 

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. या बरोबरच कष्टकरी, नोकरी करणाऱ्या, नोकरी देणाऱ्या, पत्रकार, लेखिका, व्यवसाय करण्याऱ्या स्त्रियांपासून ते सामाजिक कार्य करणाऱ्या विविध स्तरातील मिळवत्या स्त्रियांची मिळवतीची पोतडी म्हणजे अनुभवाची समृद्धी आणि प्रगल्भतेचं अवकाश. 

मिळवतीच्या पोतडीत असलेल्या आर्थिक स्थैर्याच्या बटव्यात समाधान, स्वास्थ्य व प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची वाटतात. येथे आहे ती धावपळ, शिस्त व सहनशीलतेच्या रेशीम धाग्यांनी गोफ विणत येणारी समृद्धी. 

साधारण २२-२३ वर्षांपूर्वीचा मिळवतीचा काटेरी मुकुट अजूनही बऱ्याच जणींसाठी तो काटेरीच आहे हे नक्की. जगण्यासाठीचा मोठा परीघ आखताना भावनिक गुंतणं, कोसळणं जाणवत राहतं. राग, लोभ, संघर्ष, रुसवे-फुगवे आणि असहकार या काट्याकुट्यातून, अपराधी न समजता वेगवेगळी नाती निभावून नेताना आयुष्याचा महत्वाचा टप्पा कधी पार होतो हेच समजत नाही. 

अर्थात हा जमाखर्च मांडताना अनुभवाची समृद्धी, सुसंगत विचार करण्याची ताकद, निर्णय क्षमता, आत्मविश्वास व आत्मभान यातून मिळणारे बौद्धिक समाधान आणि स्वातंत्र्य मिळवतीच्या या पोतडीतून डोकावतात.



डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Wednesday, June 21, 2023

योग: एक परिपूर्ण जीवनशैली

Yoga for Humanity



२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. 

योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. २५०० वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी 'पातंजल योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे. ते म्हणतात, 'योग:श्चित्तवृत्ती निरोध:'. म्हणजेच चित्ताची चंचल वृत्ती कमी करून मन शांत व संतुलित ठेवून आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो तो योग. या आध्यत्मिक उन्नतीकडे जाताना शारीरिक आरोग्य सांभाळणेही अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी ऋषी-मुनींनी आपल्याला आसन आणि प्राणायाम ही दोन महत्त्वाची साधने दिली आहेत. 

आसन – आसन म्हणजे 'कर चरण संस्थान विशेष:' हात व पायांची केलेली विशिष्ट रचना म्हणजे आसन. ते स्थिर आणि सुखकारक हवे. 

आसनात येणारे विशिष्ट ताण, दाब आणि पीळ यामुळे अनेक फायदे मिळतात. 
  • शरीर अत्यंत लवचिक बनते
  • स्नायूंचा tone सुधारतो. शरीरातील toxins बाहेर पडायला मदत होते
  • रक्ताभिसरण (blood circulation) सुधारते
  • डोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा योग छान काम करतो
  • योगासनांमुळे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. यामुळे मनावरचा ताण कमी होऊन quality output आपण देऊ शकतो
  • शरीरातील अनेक hormones चे संतुलन होते व त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी, menopause किंवा PCOD मुळे होणारे त्रास कमी होतात
  • काही आसनांमध्ये abdominal stretching होते. त्यामुळे insulin secretion होते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो
  • काही आसनांमध्ये chest expansion होते. ही आसने हृदयाचे आरोग्य आणि उच्च रक्तदाब यासाठी फायदेशीर ठरतात
  • आपण स्त्रिया खूप वेळ उभे राहून काम करतो. त्यामुळे होणारा vericose veins आणि पाय दुखण्याचा त्रास काही आसनांमुळे कमी होतो
  • पोट साफ न होणे, bloating जाणवणे यासाठी पवनमुक्तासन, मलासन या सारखी आसने फायदेशीर ठरतात
  • मानदुखी, कंबरदुखी, sciatica वर उपयुक्त आसने करून आपण हा त्रास कमी करू शकतो
  • Parasympathetic nervous system activate होऊन body relax होते. त्यामुळे शांत झोप लागते.
मात्र ही सर्व आसने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. 

प्राणायाम – प्राणायामाच्या माध्यमातून जेवढे जास्त प्राणशक्तीचे संचरण शरीरात होईल तेवढे आरोग्य चांगले राखले जाईल. ऋतूनुसार प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखालीच करावेत. 

सूर्यनमस्कार – वजन कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक ऊर्जा निर्माण करून तेजस्वी - ओजस्वी ठेवण्याचे काम सूर्यनमस्कारामुळे होते. 

ओंकार साधना – आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजणच तणावामध्ये  (stress)  असतो. ओंकार साधनेने आपण हा तणाव (stress level) नक्कीच कमी करू शकतो. 

चला तर मग, या योगदिनानिमित्त योगिक जीवनशैली अंगीकारून आपले सुंदर जीवन आपण आणखी निरोगी व सुंदर बनवूया. यामध्ये आपल्या कुटुंबाला व प्रियजनांना सामावून घेऊया. योग हा भारताचा ठेवा जपूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. 


 सौ. वैशाली गांधी,  
योग शिक्षिका, पुणे
 ९४२०३२१५०३
Read More

Sunday, January 1, 2023

Different approach towards the goal and resolutions

 



२०२२ संपून सुरु होईल नवीन वर्ष २०२३. वर्षभरातील अनेक हव्या नकोशा घटनांच्या आठवणींबरोबरच पिंगा घालू लागतात ते ध्येय (goal) आणि संकल्प (Resolution) यासारखे शब्द, तशी जुनीच पण सध्या नव्याने वापरात येत असलेली bucketlist आणि त्याही पुढे जाऊन vision काय, mission काय. 

ध्येय कशाचे या वर्षाचे की जीवनाचे ? आणि ते कधी ठरवायचे ? ध्येय म्हणजे व्यावसायिक यश का ? स्वतःला काय मिळवायचे आहे याचे विधान म्हणजे ध्येय का ? स्वतःची महत्त्वाकांक्षा/ध्येय साध्य करण्यासाठी त्यामागे पळणे, त्यासाठीचा अट्टहास आणि त्यामध्ये काय मिळवले किंवा गमावले याकडे होणारे दुर्लक्ष. एखादे ध्येय ठेवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे नक्कीच चांगले पण ध्येयांच्या मागे पळून निराशेची भावना नको. 

काहीतरी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय म्हणजे संकल्प. Bucketlist म्हणजे आपल्या आयुष्यात (मृत्यूपूर्वी) करण्याच्या गोष्टी यामध्ये मृत्यूपूर्वी असा नकारार्थी भाव असला तरी bucketlist मधील गोष्टी आवडीच्या पण राहून गेलेल्या आणि स्वतःसाठी करायच्या असल्याने सकारात्मकता आहे. तर नवीन वर्षाकरिता केलेला संकल्प हा तुम्हाला काय बदलायचे आहे याचे विधान असल्याने कदाचित नाही आवडले तरी करायचे असा भाव असल्याने बऱ्याच वेळा सफल होताना दिसत नाही. 

ही संकल्पातील नकारात्मकता नको असेल तर थोडा या गोष्टींवर विचार करू या का ? 

ध्येय, संकल्प साध्य करताना छोटया गोष्टीतून आनंद शोधू या का ? 

अगदी उदाहरण घ्यायचे तर सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे लोक जेवढे जवळ आले दिसतात तेवढेच दूर गेलेलेही दिसतात. कनेक्ट होण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता करता कधी आपण त्याच्या आहारी जातो कळत नाही. आभासी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत रहातो. हे करत असताना फॉरवर्डेड संदेश आपण पुढे पाठवणे किंवा त्याला भरपूर ईमोजी टाकण्यात धन्यता मानतो. दिवसाचा बराच वेळ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, स्नॅपचॅट इ. वर खर्च केला जातो. पण एखाद्याने पाठविलेल्या वैयक्तिक संदेशाकडे मात्र दुर्लक्ष करतो. Likes आणि comments म्हणजे सर्व नाही हे जरी खरे असले तरी वैयक्तिक संदेशाला किंवा कॉलला जर उत्तर दिले किंवा वैयक्तिक संदेशाची प्रशंसा केली तर संदेश पाठविणारा नक्कीच खुश होईल. काय हरकत आहे अशा छोट्या कृतीतून दुसऱ्यांना आनंद देण्यात. इतरांना आनंदी करणे हे अधिक अर्थपूर्ण आहे, नाही का? 

आपल्याला सहज शक्य असलेल्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा आणि देण्याचा संकल्प करून तेच ध्येय ठेऊन bucketlist मध्ये समाविष्ट करू या.


It is the time to say goodbye to the year 2022 and welcome New Year 2023. Along with good and not so good memories of the past year some phrases like goals, resolutions, bucket list, vision and mission come to the foreground. 

Many questions are associated with this. Whether the goals should be set for a year or should they be smaller objectives contributing to overall goals of our life? What is the right time to set them? Should professional success be considered as a goal? or should it be something one wants to achieve? Should it be an ambitious target or easily achievable? Should we run very hard to achieve the goals and feel frustrated if we fail to achieve them? Well these are some important questions but there are no straight forward answers. 

A bucket list is a list of things one wants to accomplish in the lifetime. Although there is a negative connotation as it has to be before death, there is a positivity because the things in the bucket list are things you want to do but have left behind and want to do for yourself. Usually a New Year's resolution is a change statement which needs to be achieved even if you don't like it. This is perhaps a reason why most resolutions are not achieved. Let us keep the change (and the negativity associated with it) aside and have a different approach towards the resolutions. 

Let us try and find happiness in small things while achieving goals and resolutions? 

Social media has brought people closer and everyone is accessible. But at the same time there is a disconnect. When we use social media to connect and communicate, we never know how we get trapped into it. We try to find happiness in the virtual world. We often forward forwarded messages and send emojis in response to such forwards. We spend a lot of time using Facebook, Instagram, Twitter, YouTube, Snapchat etc. and tend to ignore personal messages sent by someone. Why not send a personal message instead of a like? Why not call the person and acknowledge the post. Why not meet a friend once in a while? 

Try and spread some happiness this year through such small acts.


 Snehal Kamalapur
Read More

Sunday, December 11, 2022

ऑस्ट्रेलिया : एक अनुभव

 


नुकताच काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना भेट देण्याचा योग आला. भेटी दरम्यान लक्षात आलेल्या या वेगळेपण स्पष्ट करणाऱ्या गोष्टी ! 

आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना जमिनीच्या पारंपरिक मालकांना आदरांजली वाहून किंवा मायभूमीप्रती आदर दर्शवून, (acknowledging the traditional owners of the land and paying respects to elders past and present) भूतकाळातील आणि वर्तमानातील ज्येष्ठांना आदर द्यायला ते विसरत नाहीत. कुशल कामगारांच्या आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असेल कदाचित, पण सर्वांना माणुसकीने वागवण्याचा गुणही आचरणात आणण्यासारखा आहे. त्याबरोबर दिसली ती स्त्रियांना ही तेवढाच आदर आणि मान सन्मान देण्याची पद्धत. महिला म्हणून प्रत्येकानी आम्हाला दिलेले महत्त्व खरंच सुखावून गेले. 

विद्यापीठ परिसरातील मोठ्या मॉलसारख्या कॉम्प्लेक्समध्ये मौजमजा करताना दिसणारे विद्यार्थी स्वतः बनवलेल्या वस्तू विकून दुसर्‍यांसाठी पैसे मिळवितानासुद्धा दिसतात . शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वावलंबनासाठी दुकानांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून बिनधास्त रहाण्याबरोबरच त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव दिसते. विद्यापीठ परिसरातील आरामदायक झोके, त्यावर अभ्यास करणाऱ्या किंवा नुसतेच मस्त पहुडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून नेहमीच्या चौकटी बाहेर जाऊन अशीही काही सुविधा असू शकते असा विचार आपण कधीच का केला नाही असा प्रश्न नक्कीच पडतो. 

आजूबाजूला अनेक देशातील वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांना पाहून वाटले किती बिनधास्त आहेत हे सगळे. आपल्या मनाला योग्य वाटेल ते करणारे- कपड्यांपासून ते वागणूकीपर्यंत. कोणाला काय वाटेल, बाकीचे काय म्हणतील याची पर्वा नाही. कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना खुष ठेवणे अवघड आहे किंवा प्रत्येकाची प्रतिक्रिया ही सर्वस्वी व्यक्तीच्या आकलनावर, बुद्धीवर अवलंबून आहे हे जणू त्यांना समजल्यासारखे दिसते. त्यामुळेच ते तसा अट्टहास करताना दिसत नाही. 

स्त्री पुरुष समानताही सर्व ठिकाणी लक्षात येण्यासारखी आहे. प्रशासकीय पदावरील प्रकुलगुरू लिसा, शाश्वत साहित्य संशोधन व तंत्रज्ञान केंद्राच्या (sustainable material research and technology center) संचालिका, संशोधक वीणा सहजवाला आणि माजी विरोधी पक्षनेतेपद भूषवून राजकारणातून निवृत्त होऊन आता ऑस्ट्रेलिया भारत व्यवसाय परिषदेच्या अध्यक्षा ज्युडी मॅके या काही महत्त्वाच्या पदावरील स्त्रिया. शहर पर्यटन मार्गदर्शक, सिडनी क्रिकेट मैदानावरील पर्यटन मार्गदर्शक गेल, विद्यापीठ भेट संयोजक ॲना व अंजली किंवा रात्री १० नंतरही पुरुषांच्या बरोबरीने रस्ता दुरुस्तीवर देखरेख करणाऱ्या स्त्रिया. अशा पुरुषांची मक्तेदारी म्हणून प्रचलित असलेल्या विविध प्रकारच्या कामांसाठी स्त्रियांची नेमणूक पाहायला मिळाली. या सर्व महिला आपली जबाबदारी अगदी समर्थपणे पेलताना दिसतात. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. 

खरंच कितीतरी संधी उपलब्ध आहेत पण आपण मात्र आपल्या भोवती भिंती घालून स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे असे वाटते.



Recently, I had the privilege of visiting three Australian universities. 

Cultures in all the countries are different and unique. Some of the differences I experienced during my short stay in the country are shared herewith. All public addresses start by acknowledging the traditional owners of the land and paying respect to the elders both in the past and the present, not forgetting to respect the people who helped build the structure. It may be due to lack of skilled workers and manpower, but the virtue of treating everyone with humanity is also worth practicing. 

Students were seen studying or relaxing on comfortable hammocks, in the university premises. One wonders why we never thought about such a facility. 

I came across people from different regions and countries all over the world living life like whatever they felt right without any worries- from clothes to behavior. No fear of people judging them or 'log kya kahenge'. It may be because they seem to understand that it is difficult to please everyone no matter how hard they try. So they make it a point to be free of all the stress resulting from trying to do so. 

Giving equal respect and dignity to women is credible. The importance given to us by everyone as women was a pleasant experience. Gender equality is also noticeable everywhere. Some women hold important positions like Vice-Chancellor Lisa on administrative post, researcher Veena Sahajwala, director of the sustainable material research and technology center, and Judy McKay, who retired from active politics and is now the president of the Australia India Business Council. City Tour Guide, Sydney Cricket Ground Tour Guide Gayle, University Visit Coordinator Anna and Anjali or even after 10 pm, women supervise road repairs along with men. Women were seen being employed for various types of work which were traditionally considered as a monopoly of men. All these women are fulfilling their responsibilities very efficiently. These are some representative examples. 

There are indeed so many opportunities available, we just need to look beyond the walls we have built around ourselves.
 

Snehal Kamalapur
Read More

Sunday, October 23, 2022

दीपोत्सव मांगल्याचा !

Happy Diwali
 

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया हा दीपोत्सव 🪔🪔🪔🪔🪔🪔

मंगलमय दिवाळी सुरू होते ती गोवत्स द्वादशी किंवा वसुबारसने. गाय वासरु वा कामधेनु म्हणजे मातृत्व. 
दीपावलीचा पहिला दीप सात्विकतेचा व ममतेचा 🪔 

धनत्रयोदशी धन्वंतरी पूजनाची. धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक, पहिले चिकित्सक. 
दीपावलीचा दुसरा दीप आरोग्याचा व निरोगी आयुष्याचा 🪔 
आरोग्यम् धनसंपदा ! 

अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी काम, क्रोध, अहंकार व राक्षसी वृत्तीच्या त्यागाची. 
ज्ञानाचा व समृद्धीचा तिसरा दीप 🪔 

अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाची. पैसे, सोने-नाणे या बरोबर पूजा होते ती अलक्ष्मीचा नाश करणाऱ्या केरसुणीची. 
 स्वच्छता व आर्थिक नियोजनाचा चौथा दीप 🪔

कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा विक्रम संवत्सराचा प्रारंभ. जल प्रदूषण, वायु प्रदूषण ते ध्वनि प्रदूषणात आपला काही प्रमाणात सहभाग आहेच. हेच विराट रूप धारण करून पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. 
जल, आकाश, धरती ही तीन पावले बटू वेशातील वामनाची. म्हणून  प्रदूषण मुक्तीचा व क्षमाशीलतेचा पाचवा दीप 🪔

कार्तिक शुक्ल द्वितीया  यमद्वितीया  किंवा भाऊबीज. द्वितीयेचा चंद्र, बीजेची कोर वृद्धी दाखवणारी. द्वेष व असूयेचा त्याग करून बंधुभाव जागृत करणारी भाऊबीज. 
 निर्भयतेचा व प्रेम संवर्धनाचा सहावा दीप 🪔 

ही दिपावली सात्विकता, ममता, आरोग्य, ज्ञान, समृद्धी, निर्मलता, समाधान, आर्थिक नियोजन, प्रदूषण मुक्ती, क्षमाशीलता, निर्भयता व प्रेम संवर्धनाचे हे दीप 🪔 आपल्या आयुष्यात आनंद व मांगल्याचा प्रकाश 💥घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏


सौ.  स्नेहल कमलापूर
Read More

Monday, September 26, 2022

नवरात्र : स्त्री शक्तीचा उत्सव

 

स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र



स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र. स्त्रीच्या विविध  रूपाप्रमाणेच नवरात्रातील देवीचीही वेगवेगळी रूपे. 

नऊ दिवसाच्या या नवदुर्गा - 
  • प्रबळ इच्छाशक्ती, निर्भयता व सामर्थ्याचे प्रतीक शैलपुत्री 
  • आनंद, समाधान देणारी, शांत, सुंदर व तेजस्वी ब्रह्मचारिणी 
  • शक्तिशाली व संयमी चंद्रघंटा 
  • एकाच वेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ताकदीने आणि सचोटीने सांभाळणारी कुष्मांडा 
  • आईचे प्रेमळ रूप आणि वेळ पडली तर मुलांसाठी आवश्यक ते सर्व करण्याचा निर्धार असलेली स्कंदमाता 
  • धैर्य व शौर्याचे रूप कात्यायनी 
  • निर्भय वृत्तीची कालरात्री 
  • बुद्धिमत्ता व आशेचे प्रतीक महागौरी 
  • स्वाभिमानी व अचूक निर्णयक्षमता असलेली सिद्धीदात्री

स्त्रियांमधील गुण वैशिष्ट्ये प्रतिकात्मकपणे साजरे करणारे नवरात्र. वाईटावर चांगल्याचा विजय व नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय सांंगणारे नवरात्र.  महिला सक्षमीकरणाचे  महत्व अधोरेखित करून स्त्रियांचा आदर करण्यास शिकवणारे नवरात्र. म्हणूनच मुलींचे योग्य पद्धतीने संगोपन करणे महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल असेल असे वाटते.




सौ.  स्नेहल कमलापूर
Read More

Sunday, July 10, 2022

उपवास

आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या निमित्ताने उपवासाविषयी माझी काही प्रामाणिक मतं मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...आहारशास्त्राचा अभ्यास करताना, लोकांचं आहार-समुपदेशन करताना काही प्रश्न पडत गेले. उपवास आणि उपवासाच्या दिवशीचं खाणं-पिणं कसं असावं हा त्यापैकीच एक. 

उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वेच्छेने काहीही न खाता-पिता राहणे. तसेच उपवास हा शब्द धार्मिक गोष्टी आणि परंपरा यांच्याशी सहसा निगडित असतो म्हणून आध्यात्मिक दृष्टीने विचार केल्यास उप – जवळ आणि वास – राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे असाही एक अर्थ असावा असं मला वाटतं. 

 उपवासाचे अनेक प्रकार दिसतात. कोणी उपवासाचे पदार्थ खाऊन-पिऊन उपवास करतात, कोणी काही न खाता-पिता करतात तर कोणी अगदी पाणीसुद्धा पीत नाहीत. तसेच कोणी आठवड्यातून एकदा, कोणी महिन्यातून किंवा वर्षातून एक-दोन वेळा तर कोणी सलग एक आठवडा, एक महिनादेखील उपवास करतात. उपासाची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु असे दिसून येते की जवळजवळ प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. योग्य पद्धतीने आणि नियमित उपवास केल्यास त्याचे फायदे निश्चितच दिसतील. 

सध्या आपण कसा उपवास करतो हे येतंय ना हळूहळू डोळ्यापुढे? बऱ्याच जणांकडे उपवासाच्या पदार्थांची किंवा सामान आणण्याची वेगळी यादीच तयार होते. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर, बटाट्याचे पापड, बटाट्याचा कीस, चिप्स, बटाट्याची उकडलेली भाजी, रताळ्याचे तुपातले काप, रताळ्याची खीर, साबुदाणा-बटाट्याचा तळलेला चिवडा शेंगदाण्याचे लाडू इ. यादी संपते आहे की नाही असं वाटायला लागलं आहे... तोंडाला पाणीही सुटलं आहे. हो ना? 

आता थोडा बारकाईने विचार करूया. बघा पटतंय का...या यादीतील जवळपास सगळेच पदार्थ पिष्टमय आहेत आणि भरपूर स्निग्धांश असलेले आहेत. यामुळे आपल्याला खूप अनावश्यक कॅलरीज मिळतात. म्हणजेच पोट भरतं पण शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. असं वरचेवर होऊ लागलं की शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. 

उपवासाच्या खऱ्या अर्थाच्या जवळ पोहोचण्यासाठी प्रथम मिताहार म्हणजे अगदी कमी प्रमाणात किंवा आवश्यक तेवढेच खावे. एकादशी आणि दुप्पट खाशी हा गमतीचा भाग म्हणून ठीक आहे पण खरोखर तसे होत नाही ना याची काळजी घ्यावी. उपवासाच्या दिवशी सुद्धा आहारात योग्य तेवढी प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असलेच पाहिजेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारची फळे, सुका मेवा, राजगिरा, काही भाज्या इ. पदार्थांमधून आपल्याला समतोल साधता येऊ शकतो. आणि अर्थातच याबरोबर योग्य प्रमाणात पाणी पिणेही आवश्यक आहे. 

ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर काही विकार असतील त्यांनी उपासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

आहारात योग्य ते बदल करून आपल्या धार्मिक रूढी आणि परंपरा जपतानाच आरोग्यही जपूया... 



 Dr. (Mrs) Suchit Kamalapur 
Consultant Dietitian
Read More

Tuesday, March 8, 2022

व्यक्त व्हा !

"किती आरडाओरडा करताय एकमेकांवर” 
"मीच का गप्प बसू, सारखीच चिडचिड असते ह्याची" 
"अग पण ओरडून काही उपयोग आहे का? शब्दाने शब्द वाढतो. आपल्या भावना व्यक्त करताना दुसर्‍यांच्या दुखवण्यात काय अर्थ आहे. शांतपणे बोलून व्यक्त होऊच शकतो की आपण ."
भावना व्यक्त करणे म्हणजे प्रतिक्रिया देणे नव्हे. आनंद, दुःख, राग, प्रेम, आश्चर्य, भीती या भावना व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. बर्‍याच वेळा या तर्कसंगत असतीलच असे नाही.  

मागच्या दोन वर्षात करोनाने आपल्याला खूप काही शिकवले. भरभरून मदत देणाऱ्या पासून ते एखाद्यावर बहिष्कार टाकण्यापर्यंत, एकत्र असल्याने एकमेकांच्या जवळ येण्यापासून ते एकमेकांपासून दूर जाण्यापर्यंत, नोकरी जाण्यापासून ते कुटुंबाला एकत्रित आनंद घेता  येत नाही म्हणून नोकरी सोडण्यापर्यँत, ग्रेट डिप्रेशन पासून ते ग्रेट रेसिग्नेशन  पर्यंत, जास्तीत जास्त बाहेर राहण्यापासून ते पूर्ण वेळ घरी राहण्यापर्यंत.  या सर्वांचा स्त्रियांच्या मानसिकतेत परिणाम झाल्याचे आकडे सांगतात. 

माझ्या मते भावना व्यक्त करण्याची पद्धत ही स्त्री आणि पुरुषांची वेगवेगळी असल्याने असेल कदाचित. किती पुरुषांना तुम्ही रडताना पाहिले? रडणे म्हणजे दुर्बलता. एखादा मुलगा रडला तर तू मुलगी आहेस का असे म्हणून चिडवणारे  कमी नाहीत. अगदी बायकांचीही, लागल्या रडायला म्हणून हेटाळणी होतेच की.   आपली भावना व्यक्त करण्याची तर्‍हा प्रत्येकीची वेगळी. काही  बोलून व्यक्त होतील, काही लेखणीतून, काही आरडाओरड करतील तर काही  रडून मोकळ्या होतील. पण काही अगदी ' तुम इतना जो मुस्कुरा रही हो क्या गम है जिसको छिपा रहे हो'  कैफ़ी आजमी यांनी लिहिलेल्या या गझले सारख्या आपल्या भावना लपवून ठेवतात. आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या भावना लपवण्याचा प्रयत्न का ? 

अगदी रडून का होईना आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या स्त्रिया आपल्या भावना दडपण्याचा प्रयत्न स्त्रिया व्यसनाच्या आहारी जाऊन तर करत नाहीत ना? कदाचित त्यामुळेच की काय मुक्तांगणात स्त्रियांसाठी व्यसन मुक्तीची सोय करावी लागत आहे. मुक्ता पुणतांबेकर यांच्या लेखातील विचार खरंच काळजी वाटण्यासारखा आहे.  

तणावात राहून आलेली अस्वस्थता, बेचैनीत राहून होणारा भावनिक कोंडमारा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. मदत मागणे किंवा कोणापाशी मन मोकळे करणे हे कमीपणाचे  किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही. 

यासाठी आपल्याला काही छोट्या गोष्टी  करता येतील -  
  • नकारात्मक विचारांना वाट करून देण्यासाठी व्यक्त होणे  
  • प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणे  
  • एखादी कला किंवा छंद जोपासणे 
  • जमत नसेल तर नाही म्हणायला शिकणे 
  • सर्व गोष्टींचे विश्लेषण करून ध्येय ठरवणे  
  • स्वतःला प्राधान्य व वेळ देणे  

व्यक्त व्हा , आनंदी रहा!!! 
 
#भावना  
#ExpressEmotions 
#Women's day 



डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Thursday, February 24, 2022

Gender Budget

 



भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील चौथा अर्थसंकल्प मांडला. महिला सक्षमीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात लिंग आधारित अर्थसंकल्प (जेंडर बजेट)  सादर करायला भारतात २००५-०६ मध्ये सुरुवात झाली. यावर्षी भारताच्या वित्तमंत्र्यांनी १७वा लिंग आधारित अर्थसंकल्प सादर केला. 

लिंग आधारित अर्थसंकल्पात  महिलांना पूर्ण किंवा अंशतः लाभ होतील अशा योजनांसाठी काही रक्कम राखीव ठेवलेली असते. विभाग अ (Part A) आणि विभाग ब (Part B) असे दोन भाग या अर्थसंकल्पात येतात. विभाग अ मध्ये महिलांना पूर्ण लाभ होतील आणि विभाग ब मध्ये महिलांना अंशतः (३०%-९९%) लाभ असतील अशा योजना येतात. 

या वर्षी २०२२-२३ साठी लिंग आधारित अर्थसंकल्पासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या ४.३% म्हणजेच ₹ १,७१,००६ कोटी राखीव आहेत. महिलांसाठीच्या कार्यक्रमांची , प्रकल्पाची आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वापरता येतात. विभाग अ साठी ₹ २५,३३९.१३ वरून ६% ने वाढवून ₹ २६,७७२.८९ तसेच विभाग ब साठी ₹ १,२८,७४९.८३ वरून १२ % ने वाढवून ₹ १,४४,२३३. ५८ इतकी रक्कम राखीव ठेवलेली आहे. 

लिंग आधारित अर्थसंकल्प योजना प्रामुख्याने ग्रामीण विकास, महिला आणि बाल विकास, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शिक्षण यावर केंद्रित आहेत 
  • ग्रामीण विकास योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण गृहनिर्माण (प्रधानमंत्री आवास योजना), इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यांचा समावेश होतो
  • महिला आणि बाल विकास योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, अंगणवाडी सेवा, बाल संरक्षण सेवा, राष्ट्रीय पोषण अभियान, वन स्टॉप सेंटर, केंद्रीय समाज कल्याण मंडळ, बेटी बचाओ बेटी पढाओ, किशोरवयीन मुलींसाठी योजना, स्वाधार गृह, राष्ट्रीय महिला आयोग, कार्यरत महिला वसतिगृह यांचा समावेश होतो
  • शैक्षणिक योजनांमध्ये संपूर्ण शिक्षा, शाळांमधील माध्यान्ह भोजनाचा राष्ट्रीय कार्यक्रम, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती, केंद्रीय विद्यापीठांसह विद्यापीठ अनुदान आयोग, अभिमत विद्यापीठे आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), भारतीय तंत्रज्ञान संस्थांना समर्थन, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांना सहाय्य यांचा समावेश होतो
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजनांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) अंतर्गत आरोग्य प्रणाली मजबूत करणे, पायाभूत सुविधांची देखभाल करणे समाविष्ट आहे
  • गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) समाविष्ट आहे.
केंद्रीय स्तरावरील महिला आणि बाल विकास मंत्रालयासारख्या प्रादेशिक कार्यालयातील (नोडल एजन्सी) अधिकाऱ्यांची क्षमता वाढवून ते इतर विभागांसोबत काम करू शकतात. हे अधिकारी लिंग आधारित संवेदनशील प्रकल्प आणि कार्यक्रमांचे नियोजन, अर्थसंकल्प आणि अंमलबजावणीसाठी धोरणे यामध्ये लक्ष घालतात . अनुदान आणि इतर योजनांचे तपशील येथे उपलब्ध आहेत -
https://wcd.nic.in/schemes-listing/2419
https://wcd.nic.in/schemes-listing/2404
https://wcd.nic.in/schemes-listing/2405 
https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana



Nirmala Sitharaman who has presented the forth union budget, is the first full time woman finance minister. 

17th Gender Budget is presented this year. Gender-responsive budgeting in India was adopted in 2005-06. The gender budget includes allocations made by different ministries for schemes that fully or partially benefit women. 

The Gender Budget has two parts: Part A and Part B. Part A includes schemes that are 100% targeted towards women and girls beneficiaries while Part B includes Pro-women and girl schemes in which 30 to 99% allocations are towards women and girls.

The gender budget has gone up in absolute numbers to ₹ 1, 71,006.5 crores in 2022-23 this is approx.4.3 per cent of the total budget of 2022-23 budget. Gender Budget is used for implementing women related programmes, projects and schemes. 

The Part A of the gender budget has been increased by 6% from last year's revised budget ₹ 25339.13 to ₹ 26,772.89 crore. A hike of 12 % as compared to last year, from ₹1,28,749.83 to ₹ 1,44,233.58 crore in Part B. 

Gender Budget schemes are majorly focused on Rural development, women and child development (WCD), housing and urban affairs, health and family welfare and education.
  • Rural development schemes include Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Rural Housing (Pradhan Mantri Awaas Yojana), Indira Gandhi National Widow Pension Scheme
  • Women and child development schemes include Pradhan Mantri Matru Vandana Yojana, Anganwadi Services, Child Protection Services, National Nutrition Mission, One Stop Centre, Central Social Welfare Board , Beti Bachao Beti Padhao , Scheme for Adolescent Girls, Swadhar Greh , National Commission for Women , Working Women Hostel
  • Education schemes include Samagra Shiksha , National Programme of Mid Day Meals in Schools, Kendriya Vidyalaya Sangathan, Navodaya Vidyalaya Samiti, University Grants Commission including Central Universities, Deemed Universities and All India Council for Technical Education (AICTE), Support to Indian Institutes of Technology, Support to National Institutes of Technology
  • Health and family welfare schemes include Health System Strengthening under National Rural Health Mission (NRHM), Infrastructure Maintenance Housing and urban affairs schemes include Pradhan Mantri Awas Yojana (Urban).
Nodal agencies like the Ministry of women and child development at central level may work with other departments by building capacities of the officials. These officials are involved in policies, projects and programmes for gender sensitive planning, budgeting and implementation. 

Details of grants and other schemes are available on – 
https://wcd.nic.in/schemes-listing/2419 
https://wcd.nic.in/schemes-listing/2404 
https://wcd.nic.in/schemes-listing/2405 
https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana


डॉ. स्नेहल कमलापूर


References- 
https://www.indiabudget.gov.in/ 
https://www.indiabudget.gov.in/doc/eb/stat13.pdf
Read More

Thursday, December 16, 2021

सुपरवूमन बनण्याचा अट्टाहास का ?

Superwoman Syndrome


राही एक कर्तबगार आई, बायको आणि सून. ऑफिसमध्ये कार्यक्षम, सोसायटीच्या कामात पुढे असणारी राही. अर्थातच बाकी नातेवाईकांच्याही अपेक्षा सांभाळणारी राही. किती आदर्श आहे ना राही ? 

प्रत्यक्षात रोजच्या तणावामुळे अगदी शांत झोपही लागत नाही राहीला . सगळ्यांना खुश ठेवताना होणारी दमछाक तिला असह्य होते आहे. ताणतणावामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम तिला जाणवतो आहे. 

आजूबाजूला पाहिले तर अशा बऱ्याच राही दिसतील. थोड्याफार फरकाने यासारखीच दिनचर्या असणाऱ्या कितीतरी राही. 

कदाचित हा सुपरवूमन सिन्ड्रोम असू शकतो. 

सुपरवूमन ही संज्ञा १९८४ ला पहिल्यांदा वापरात आली. स्वतःला त्रास झाला तरी चालेल किंवा स्वतःकडे दुर्लक्षही झाले तरी चालेल म्हणजेच स्वतःचा विचार न करता, सर्व गोष्टी मीच करणार ह्या स्वभावाला सुपरवूमन सिन्ड्रोम म्हणता येईल. 

सुपरवूमन सिन्ड्रोममुळे बऱ्याच वेळा स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा सगळ्यांना खुश करण्यासाठी स्त्रिया बरेच काही करतात . यातून कधी दुर्लक्ष झालेच तर स्वतःला दोष देतात. सर्व परिपूर्ण असण्याच्या अट्टाहासात स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. 

आपण या प्रतिमेत अडकत आहोत का यासाठी आपण काही गोष्टी तपासून पाहू शकतो - 
  • मीच सर्व करणे गरजेचे आहे वाटते का ? 
  • उशिरा पर्यंत जागून कामे करण्याची गरज पडते का ? 
  • व्यायाम करायचा कंटाळा येतो का? की वेळच मिळत नाही 
  • सतत परफेक्ट असावे असे वाटते का ? 
  • सतत कारण नसताना चिडचिड होते का ? 
  • कारण नसताना गोष्टी विसरत आहात का ? 
  • अकारण कशाची तरी सतत चिंता सतावते आहे का? अस्वस्थता जाणवते का ? 
  • अकारण अंगदुखी, डोकेदुखी जाणवते का ? 
  • मन एकाग्र करायला त्रास होतो का ? 
  • निद्रानाशाचा किंवा निद्रातिरेकाचा त्रास होतो का ? 
या प्रश्नांची उत्तरे हो असतील किंवा खालील प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर विचार करण्याची नक्कीच गरज आहे असे वाटते . 
  • उद्याबद्दल सकारात्मक आहात का ? 
  • शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहात का ? 
  • स्वतःसाठी वेळ देता का ? 
  • काम करताना उत्साह वाटतो का? 
  • मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईक यांची Support system आहे का ? 
कदाचित कुटुंबातले नवरा, मुले, सासू सासरे , नातेवाईक म्हणतील आम्ही कुठे तू स्वतःकडे दुर्लक्ष करून फक्त आमच्याकडेच लक्ष दे सांगितले? तू का नाही स्वतःला वेळ दिला ? वाल्याकोळ्यासारखी आपली अवस्था नाही ना ? 

इतर सर्वांना खुश ठेऊन, स्वतःकडे दुर्लक्ष करून शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करणे किती योग्य आहे ? 

मला वाटते, खरं तर सुपरवूमन सिन्ड्रोम मधून बाहेर येण्याची गरज आहे. 

सुपरवूमन प्रतिमेत न अडकण्यासाठी या काही गोष्टी करून पहा - 

  • स्वतः साठी वेळ द्या 
  • स्वतःचे लाड करा, मजेत रहा 
  • शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूक रहा 
  • परिपूर्णच असणे गरजेचे नाही हे लक्षात ठेवा 
  • स्पष्टपणे नाही म्हणायला शिका 
  • गरज असेल तर मदत मागा. मदत मागणे किंवा कोणापाशी मन मोकळे करणे यात कमीपणा नाही . 

आनंदी रहा, मस्त रहा आणि स्वस्थ रहा !!!


डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Wednesday, July 7, 2021

कविता - बहरतील सारी मने

 


                                                    बहरतील सारी मने 
                                                    बहरतील सारी मने 
                                                    पुन्हा एकदा कालांतराने 
                                                    खुलतील पुन्हा नव्याने 
                                                    या हृदयातली स्पंदने..  
                                                                बहरतील सारी मने 
                                                                 मळभ सारे संपता 
                                                                 आनंदाश्रूंनी भरतील डोळे 
                                                                 संयम कायम ठेवता  
                                                    काळजाचे तुकडे कुठे 
                                                    कासावीस मातापिता 
                                                    ओढ कुंकवाची उरी 
                                                    परी नि:शब्द स्तब्धता  
                                                                 कोवळ्या मनांना 
                                                                 कोमेजून टाकणारी शांतता 
                                                                 अग्निपरीक्षा पार होता 
                                                                 संपेल सारी आर्तता 
                                                                 हसतील सारे डोळे 
                                                                 नव्याने सुख पाहता 
                                                 आशेची ही ओढ मनातील 
                                                 अन विचारांचा घोळका 
                                                 जळमट हे जाईल निघून 
                                                 अन श्वास होईल मोकळा.. 
                                                                  तू पूर्वीचा ना राहशील 
                                                                  या वादळातून निघताना 
                                                                  उगवेल मग् नवी पहाट 
                                                                  कुशीत सामावून घेताना 
                                                 बहरतील सारी मने 
                                                 पुन्हा एकदा कालांतराने 
                                                 टाकताना पुढे पावले 
                                                 जुन्याच वाटा तरी नवीन दिशेने.. 
                                                                                             
                                                                                                        - प्रिती वैद्य
Read More

Monday, June 21, 2021

संगीतावर होत असलेला दृक्श्राव्य माध्यमांचा परिणाम

 


संगीत हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे, वेगवेगळ्या अभिरुची प्रमाणे वेगवेगळे संगीत ऐकले जाते. यामध्ये शास्त्रीय संगीतापासून ते रॅप music पर्यंत आवड श्रोत्यांमध्ये दिसून येते. 

सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याच्या परिणामापासून संगीत ही कला सुद्धा वेगळी राहू शकली नाही किंबहुना सांगीतिक रसिकतेवर माध्यमांचा बडगा दिसून येतो. सगळ्यांनाच चांगलं म्हणण्याचा नादात खरंच चांगलं काय आणि वाईट काय हेच नवीन पिढीला कळत नाही की काय असं वाटायला लागतं. मुळात संगीताच्या रियालिटी शोजमुळे संगीत हे सहज शक्य आहे असं वाटायला लागतं पण मुळात चित्रच वेगळे आहे. सांगीतिक जडण-घडण, त्यासाठी लागणारा रियाज, गौण  झाल्यासारखे वाटत आहेत.

शास्त्रीय संगीत या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवे. माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या कलाकारांना किती मान मिळतो हे आपल्याला माहीत आहे, पण सातत्य टिकवून सादरीकरण करणारे कलाकारच शेवटी रसिकांच्या मनावर राज्य करत असतात. गुरूंकडून मिळालेले शास्त्रोक्त ज्ञान, त्यावर केलेला स्वतःचा विचार, चिंतन, मनन याच्या अनुषंगाने केलेले सादरीकरण हेच परिणामकारक ठरू शकते, म्हणून ज्याला संगीतात करियर करायचे आहे त्याने आपला गुरु डोळसपणे निवडून आपले मार्गक्रमण करावे. माध्यमांच्या आहारी न जाता आधी स्वतःच्या प्रस्तुती करणाचा विचार करावा आणि स्वतःला सिद्ध करावे. 

विद्यार्थ्यांच्या जडण-घडणामध्ये पालकांचा मोठा वाटा असतो. काही पालक डोळसपणे आपल्या पाल्याची प्रगती बघत असतात तर काही पालक अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. अपेक्षा बाळगणे चूक नाही परंतु त्या दिशेने पावले उचलताना संयम ठेवणे अत्यावश्यक आहे.

एक शिक्षक म्हणून मला वाटतंय की मुलांनी आणि पालकांनी रियालिटी शोज बघावे आणि त्यातून प्रोत्साहन ही द्यावे पण त्याच्यामागे अवास्तव अपेक्षा बाळगणं कमी करावे, त्यापेक्षा आपल्या पाल्याला संगीत शिकण्यास प्रोत्साहन द्यावे.


सौ. मिनल कुलकर्णी - देशपांडे (एम. ए. संगीत)
Read More