काय गं कोणत्या गहन प्रश्नावर एवढा विचार करते आहेस ?
अगं स्वतःला दोष देते आहे एवढे कसे माझ्या लक्षात आले नाही. मेसेज वर आलेल्या लिंक वर क्लिक करायचे नाही, डिजिटल पेमेंट करताना व्यवस्थित शहानिशा करायची , नेट transaction करण्यासाठीही लिमिट ठेवले आहे असे असून ही मैत्रिणीचा व्हॉट्सॲप मेसेज आला म्हणून पैसे पाठवून मोकळी झाले. दोन तीन वेगवेगळ्या नंबर वरून तिचा मेसेज पाहून शंका आली म्हणून फोन करून विचारले तेव्हा तिचा मोबाइल हॅक झाला असून त्या नंबरचे सगळे मेसेजेस डिलिट झाल्याचे लक्षात आले. जर दोघींनीं two step verification केले असते तर कदाचित दोघींना त्रास झाला नसता.
छोट्याश्या गोष्टीमुळे मोठ्या आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
W20 आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nation) चे उद्दिष्ट डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे तसेच स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हे आहे. सध्या G20 चे नेतृत्व भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी करत असून W20 हा G20 चा अधिकृत गट आहे. या गटाने महिला उद्योजकता, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे, महिलांचे शिक्षण व कौशल्य विकास आणि वातावरण बदल या पाच महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे.
या वर्षीची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक महिला दिनाची theme ही अगदी मिळतीजुळती आहे "DigitALL: Technology and innovation for gender equality".
डिजिटल तंत्रज्ञान हे व्यवसाय आणि समाजाच्या केंद्रस्थानी आहे. महिला सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम बनते.
डिजिटल तंत्रज्ञानाने तसेच Information and Communication Technology (ICT) च्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे, आपले उत्पादन विकणे, चांगली नोकरी मिळवणे, शिक्षण घेणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे, आर्थिक व्यवहार, सामाजिक कार्यात सहभाग तसेच माहीती मिळवणे यासारख्या किती तरी गोष्टी शक्य आहेत. यामध्ये शहरी व ग्रामीण महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी गरजेची आहे ती डिजिटल साक्षरतेची.
डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्याने महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
डिजिटल वापरातील संधीमधील लिंगभेद हा फक्त मोबाइल किंवा इंटरनेट माहिती दळणवळण /तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचा नसून बऱ्याच गोष्टीं मधील महिला व पुरुष यांच्या तफावतीतील आहे
डिजिटल साधनांचा , तंत्रज्ञानांचा वापर आणि कौशल्यातील तफावत, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील शिक्षणातील तफावत, तंत्रज्ञानातील नेतृत्व तसेच उद्योगजकतेतील तफावत ही काही उदाहरणे देता येतील. पण हे सर्व तर उपलब्ध आहे असा विचार नक्कीच आपल्या मनात आला असेल. मात्र लिंगाधारित डिजिटल विभाजन निर्देशांक (The Gender Digital Divide Index (GDDI) ) पाहिला तर फक्त ५७% महिला इंटरनेट चा वापर करतात. हा अहवाल बनवताना वेगवेगळ्या उत्पन्न गटातील देश विचारात घेतले आहेत. यामध्ये भारत, ब्राझील, चिली, चीन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इजिप्त, इथिओपिया, हैती, मेक्सिको, नायजेरिया, रशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, ताजिकिस्तान, युगांडा, युक्रेन, युनायटेड स्टेट्स, व्हिएतनाम या देशांचा समावेश करण्यात आला आहे.
Deloitte च्या अंदाजानुसार, 2019 ते 2022 पर्यंत एकूण जागतिक तंत्रज्ञान कार्यबलामध्ये महिलांचा वाटा 6.9% , आणि तांत्रिक भूमिकांमध्ये त्यांचा वाटा 11.7% ने वाढला असला तरी हे तंत्रज्ञानातील महिलांचे प्रमाण अगदीच कमी आहे म्हणजे साधारण २५% आहे.
GDDI हा तीन निर्देशक श्रेण्यातील ३० वेगवेगळ्या गोष्टींवर आधारीत असून ह्यात
- पायाभूत सुविधा - इंटरनेट कव्हरेज, आर्थिक दृष्ट्या परवडणारी पायाभूत सुविधा,माहिती संरक्षण, सायबर सुरक्षेसाठी धोरणे तसेच आरोग्य व कामगारातील संधीमधील लिंगभेद दोन शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs)
- सक्षम धोरण व अंमलबजावणी- डिजिटल समावेशकता, पारदर्शकता आणि डिजिटल कौशल्यां साठी असलेली सरकारी धोरणे आणि उपक्रम व त्या द्वारे होणारी प्रगती
- वास्तविकता /परिणाम -इंटरनेट, मोबाइल फोन वापर आणि डिजिटल पेमेंट, तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील निर्णय घेण्यामध्ये स्त्री पुरुष संतुलन.
पायाभूत सुविधा या श्रेणीत भारत ६व्या क्रमांकावर असून, सक्षम धोरण राबविण्यात ४थ्या पण परिणाम पाहिल्यास १६व्या क्रमांकावर आहे. सर्वसाधारण एकूण क्रमवारीत भारत ९व्या क्रमांकावर आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील तसेच इंटरनेट माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणात भारताने प्रगती केली आहे पण काही मोजता येण्या सारख्याच महिला तंत्रज्ञ पदावर काम करताना दिसतात. म्हणजेच एकूण तेवढा प्रभावी परिणाम दिसत नाही.
प्रभावी परिणामासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. त्यासाठी
गरजेचे आहे ते leading by example. आणि solutions by women for women.
स्वतःमध्ये असलेल्या गुणाचा उपयोग आपल्या एखाद्या मैत्रिणीला होत असेल तर प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.
WeResilient या महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या उपक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता.
तुम्ही volunteer होऊन निरनिराळे कार्यक्रम आयोजित करायला मदत करू शकता, आपल्या माहितीतील काहीतरी वेगळे कार्य करणार्या महिलांबदल आम्हाला कळवू शकता, WeResilient साठी लेख, कविता, आलेले अनुभव लिहू शकता, आमच्या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होऊ शकता.
चला आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण ही एक पाऊल पुढे टाकू. यासाठी आपण फक्त एक फॉर्म भरून या कार्यात सहभागी होऊ शकता.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Happy Women's Day !!!
0 comments:
Post a Comment
Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment