Monday, January 10, 2022

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

 

TEN TIPS TO FOLLOW WHILE EATING

आपल्यापैकी बहुतेकांनी वदनी कवळ घेता... हा श्लोक ऐकला आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ही या श्लोकातील शेवटची ओळ. या ओळीत जो खोलवर अर्थ दडला आहे तो आपण खरंच समजून घेतला आहे का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्वयंपाक करण्यापासून ते प्रत्यक्ष जेवण होईपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया एक पवित्र कार्य समजून केल्या जाव्यात असे या ओळीत अभिप्रेत आहे. 

आजच्या वेगवान जगात आरोग्यपूर्ण आहारासाठी आपण सर्वजण अधिक जागरूक झालो आहोत. खाण्या-पिण्याच्या योग्य सवयींमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. 

काय खावं आणि काय खाऊ नये हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते कसं खावं हेही महत्त्वाचं आहे. लक्षपूर्वक खाणे म्हणजे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी सुधारणे, खाताना आपल्या मनावर आणि मेंदूवर आपलं नियंत्रण असणे. खाताना नीट लक्ष देऊन खाल्लं नाही तर अंगी लागत नाही... अंगी लागणं म्हणजे वजन वाढणं नाही तर खाल्लेल्या अन्नातले सर्व चांगले / पौष्टिक घटक शोषले जाऊन त्याचा शरीराला योग्य तो उपयोग होणं हे अभिप्रेत आहे. 
जेवताना पाळावयाची दशसूत्री: 
  • घरी शिजवलेल्या खाण्यास प्राधान्य द्यावे
  • पौष्टिक अन्नाची निवड करावी 
  • आहार वैविध्यपूर्ण असावा 
  • जेवण्याच्या वेळा आणि जेवणाची जागा निश्चित करावी.ही जागा स्वच्छ व शांत असावी
  • लक्ष विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी (TV, mobile phone, वर्तमानपत्रे इ.) जेवताना दूर ठेवाव्यात
  • जेवताना पूर्ण लक्ष जेवणाकडे असावे म्हणजेच जेवत असताना आपली पाचही ज्ञानेंद्रिये वापरली जावीत - प्रथम ताटात वाढलेले जेवण डोळ्याने पाहावे , नाकाने खाद्यपदार्थांचा वास घ्यावा , हाताने त्याला स्पर्श करावा, चावताना कानाने ऐकावे आणि शेवटी जिभेने त्याची चव घ्यावी
  • अन्न व्यवस्थित चावून खावे. अन्न आपल्या तोंडातील लाळेबरोबर पूर्ण एकजीव होईपर्यंत चावावे
  • सावकाश जेवावे. पोट भरले आहे हा संदेश मेंदूला पोहोचेपर्यंत २० मिनिटांचा कालावधी जावा लागतो. भराभर जेवल्याने आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ले जाण्याची शक्यता असते
  • आपल्या ताटातील अन्नाप्रती, ज्यांनी स्वयंपाक केला आहे त्यांच्याप्रती आणि ज्यांनी आपल्यासाठी शेतात अन्न पिकवले आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगावी
  • जेवताना मनःस्थिती शांत असावी. शांत मनःस्थितीत योग्य तेवढे अन्न खाल्ले जाते आणि खाल्लेले अंगी लागते असे आढळून आले आहे. 
यामुळे होणारे फायदे: 
  • वजन आटोक्यात राहते
  • अतिरिक्त खाणे टाळता येते
  • वेळी-अवेळी खाणे, stress eating इ. टाळता येते
  • रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
  • हृदयाचे आरोग्य सुधारते
  • पचन सुधारते
  • चुकीचे खाल्ले गेल्यामुळे येणारी अपराधीपणाची भावना न येता जेवल्याचे पूर्ण समाधान मिळते. 
 स्वयंपाकापासून ते जेवण होईपर्यत ही पूर्ण प्रक्रिया आनंददायी होवो!! 

There is a tradition of reciting a shlok... vadani kaval gheta...in many Marathi families. The last sentence of this shlok is...udarabharana nohe jaanije yadnyakarma. There is a deep thought hidden in this line. The entire process...right from cooking to actual eating food should be considered as a pious act and not just mechanical eating. 

Many people today are aware that we should eat healthy. It’s really good that more and more people are getting aware of healthy foods as it brings positivity to our physical and mental well-being. 

How to eat is equally important along with what to eat and what not to eat. Mindful eating means improving the eating habits, keeping mind and brain under control. Mindful eating also helps get food better absorbed in the body. 

TEN TIPS TO FOLLOW WHILE EATING – 
  • Prefer home cooked food
  • Choose healthy food
  • Have variety in what you eat
  • Fix eating timings and eating place
  • Eating place should be clean, well ventilated, calm and quiet
  • Keep away all distractions like mobile phones, television, newspapers etc.
  • Pay entire attention to eating. Use all five senses while eating – See the food with your eyes, smell it with your nose, touch it with your hands, hear the chewing sound with your ears and enjoy the taste with your tongue
  • Chew well. Let it get completely mixed with the saliva
  • Eat slowly. It takes 20 minutes for brain to receive the signal that the tummy is full. If you eat fast, it’s quite likely that you overeat
  • Have gratitude towards the food, for the person who have cooked the food and for the person who has grown the food
  • Stay calm when you eat.
BENEFITS – 
  • Weight control 
  • Improves digestion 
  • Overeating can be avoided 
  • Stress eating, irregular eating can be avoided
  • Improves blood sugar levels
  • Promotes heart health
  • The guilt caused by wrong eating habits can be avoided. 
May the entire process of eating...right from cooking to eating give pleasure to you all!!


Dr. Suchit Kamalapur, Dietitian

Related Posts:

  • उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म  आपल्यापैकी बहुतेकांनी वदनी कवळ घेता... हा श्लोक ऐकला आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ही या श्लोकातील शेवटची ओळ. या ओळीत जो खोलवर अर्थ दडला आह… Read More
  • Plastic Recycling CodesAs per research only 9% of plastic can be recycled. As a consumer it is necessary to know about plastic recycling, recycling symbols and how to recycl… Read More
  • Blood donation is a reflection of our physical well-being   काही वर्षांपूर्वी माझ्या एका अगदी जवळच्या व्यक्तीला ऑपरेशन मधील गुंतागुंतीमुळे बरेच रक्त देण्याची गरज होती. रक्त पेढीतून (blood bank) … Read More
  • Eating Healthy This Diwali सप्रेम नमस्कार, आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुख-समाधाना… Read More
  • Plastic and Health  Earth is drowning with plastic. Look around you and plastic is everywhere. We are using plastic products from head to toe.  Can you think … Read More

1 comment:

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment