नुकताच काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना भेट देण्याचा योग आला.
भेटी दरम्यान लक्षात आलेल्या या वेगळेपण स्पष्ट करणाऱ्या गोष्टी !
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना जमिनीच्या पारंपरिक मालकांना आदरांजली वाहून किंवा मायभूमीप्रती आदर दर्शवून, (acknowledging the traditional owners of the land and paying respects to elders past and present) भूतकाळातील आणि वर्तमानातील ज्येष्ठांना आदर द्यायला ते विसरत नाहीत. कुशल कामगारांच्या आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असेल कदाचित, पण सर्वांना माणुसकीने वागवण्याचा गुणही आचरणात आणण्यासारखा आहे.
त्याबरोबर दिसली ती स्त्रियांना ही तेवढाच आदर आणि मान सन्मान देण्याची पद्धत.
महिला म्हणून प्रत्येकानी आम्हाला दिलेले महत्त्व खरंच सुखावून गेले.
विद्यापीठ परिसरातील मोठ्या मॉलसारख्या कॉम्प्लेक्समध्ये मौजमजा करताना दिसणारे विद्यार्थी स्वतः बनवलेल्या वस्तू विकून दुसर्यांसाठी पैसे मिळवितानासुद्धा दिसतात .
शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वावलंबनासाठी दुकानांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून बिनधास्त रहाण्याबरोबरच त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव दिसते.
विद्यापीठ परिसरातील आरामदायक झोके, त्यावर अभ्यास करणाऱ्या किंवा नुसतेच मस्त पहुडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून नेहमीच्या चौकटी बाहेर जाऊन अशीही काही सुविधा असू शकते असा विचार आपण कधीच का केला नाही असा प्रश्न नक्कीच पडतो.
आजूबाजूला अनेक देशातील वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांना पाहून वाटले किती बिनधास्त आहेत हे सगळे. आपल्या मनाला योग्य वाटेल ते करणारे- कपड्यांपासून ते वागणूकीपर्यंत. कोणाला काय वाटेल, बाकीचे काय म्हणतील याची पर्वा नाही. कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना खुष ठेवणे अवघड आहे किंवा प्रत्येकाची प्रतिक्रिया ही सर्वस्वी व्यक्तीच्या आकलनावर, बुद्धीवर अवलंबून आहे हे जणू त्यांना समजल्यासारखे दिसते. त्यामुळेच ते तसा अट्टहास करताना दिसत नाही.
स्त्री पुरुष समानताही सर्व ठिकाणी लक्षात येण्यासारखी आहे.
प्रशासकीय पदावरील प्रकुलगुरू लिसा,
शाश्वत साहित्य संशोधन व तंत्रज्ञान केंद्राच्या (sustainable material research and technology center) संचालिका, संशोधक वीणा सहजवाला आणि माजी विरोधी पक्षनेतेपद भूषवून राजकारणातून निवृत्त होऊन आता ऑस्ट्रेलिया भारत व्यवसाय परिषदेच्या अध्यक्षा ज्युडी मॅके या काही महत्त्वाच्या पदावरील स्त्रिया. शहर पर्यटन मार्गदर्शक, सिडनी क्रिकेट मैदानावरील पर्यटन मार्गदर्शक गेल, विद्यापीठ भेट संयोजक ॲना व अंजली किंवा
रात्री १० नंतरही पुरुषांच्या बरोबरीने रस्ता दुरुस्तीवर देखरेख करणाऱ्या स्त्रिया. अशा पुरुषांची मक्तेदारी म्हणून प्रचलित असलेल्या विविध प्रकारच्या कामांसाठी स्त्रियांची नेमणूक पाहायला मिळाली. या सर्व महिला आपली जबाबदारी अगदी समर्थपणे पेलताना दिसतात.
ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
खरंच कितीतरी संधी उपलब्ध आहेत पण आपण मात्र आपल्या भोवती भिंती घालून स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे असे वाटते.
Recently, I had the privilege of visiting three Australian universities.
Cultures in all the countries are different and unique. Some of the differences I experienced during my short stay in the country are shared herewith.
All public addresses start by acknowledging the traditional owners of the land and paying respect to the elders both in the past and the present, not forgetting to respect the people who helped build the structure. It may be due to lack of skilled workers and manpower, but the virtue of treating everyone with humanity is also worth practicing.
Students were seen studying or relaxing on comfortable hammocks, in the university premises. One wonders why we never thought about such a facility.
I came across people from different regions and countries all over the world living life like whatever they felt right without any worries- from clothes to behavior. No fear of people judging them or 'log kya kahenge'. It may be because they seem to understand that it is difficult to please everyone no matter how hard they try. So they make it a point to be free of all the stress resulting from trying to do so.
Giving equal respect and dignity to women is credible. The importance given to us by everyone as women was a pleasant experience. Gender equality is also noticeable everywhere. Some women hold important positions like Vice-Chancellor Lisa on administrative post, researcher Veena Sahajwala, director of the sustainable material research and technology center, and Judy McKay, who retired from active politics and is now the president of the Australia India Business Council. City Tour Guide, Sydney Cricket Ground Tour Guide Gayle, University Visit Coordinator Anna and Anjali or even after 10 pm, women supervise road repairs along with men. Women were seen being employed for various types of work which were traditionally considered as a monopoly of men. All these women are fulfilling their responsibilities very efficiently. These are some representative examples.
There are indeed so many opportunities available, we just need to look beyond the walls we have built around ourselves.
Snehal Kamalapur
Mast !
ReplyDeleteNicely expressed 👌
ReplyDelete