बहरतील सारी मनेबहरतील सारी मनेपुन्हा एकदा कालांतरानेखुलतील पुन्हा नव्यानेया हृदयातली स्पंदने..बहरतील सारी मनेमळभ सारे संपताआनंदाश्रूंनी भरतील डोळेसंयम कायम ठेवताकाळजाचे तुकडे कुठेकासावीस मातापिताओढ कुंकवाची उरीपरी नि:शब्द स्तब्धताकोवळ्या मनांनाकोमेजून टाकणारी शांतताअग्निपरीक्षा पार होतासंपेल सारी आर्तताहसतील सारे डोळेनव्याने सुख पाहताआशेची ही ओढ मनातीलअन विचारांचा घोळकाजळमट हे जाईल निघूनअन श्वास होईल मोकळा..तू पूर्वीचा ना राहशीलया वादळातून निघतानाउगवेल मग् नवी पहाटकुशीत सामावून घेतानाबहरतील सारी मनेपुन्हा एकदा कालांतरानेटाकताना पुढे पावलेजुन्याच वाटा तरी नवीन दिशेने..
- प्रिती वैद्य
बहरतील सारी मने ....WeResilientच्या माध्यमातून ....उरी नवी स्वप्ने घेऊन
ReplyDeletekhup positive
ReplyDeleteखूप छान !! खूपच आशावादी आणि पोसिटीव्ह
ReplyDeleteReally optimistic and beautiful poem !!! I look forward to your writing...
ReplyDeletenice one
ReplyDeletevery nice maam
ReplyDelete