Wednesday, June 21, 2023

योग: एक परिपूर्ण जीवनशैली

Yoga for Humanity



२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. 

योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. २५०० वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी 'पातंजल योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे. ते म्हणतात, 'योग:श्चित्तवृत्ती निरोध:'. म्हणजेच चित्ताची चंचल वृत्ती कमी करून मन शांत व संतुलित ठेवून आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो तो योग. या आध्यत्मिक उन्नतीकडे जाताना शारीरिक आरोग्य सांभाळणेही अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी ऋषी-मुनींनी आपल्याला आसन आणि प्राणायाम ही दोन महत्त्वाची साधने दिली आहेत. 

आसन – आसन म्हणजे 'कर चरण संस्थान विशेष:' हात व पायांची केलेली विशिष्ट रचना म्हणजे आसन. ते स्थिर आणि सुखकारक हवे. 

आसनात येणारे विशिष्ट ताण, दाब आणि पीळ यामुळे अनेक फायदे मिळतात. 
  • शरीर अत्यंत लवचिक बनते
  • स्नायूंचा tone सुधारतो. शरीरातील toxins बाहेर पडायला मदत होते
  • रक्ताभिसरण (blood circulation) सुधारते
  • डोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा योग छान काम करतो
  • योगासनांमुळे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. यामुळे मनावरचा ताण कमी होऊन quality output आपण देऊ शकतो
  • शरीरातील अनेक hormones चे संतुलन होते व त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी, menopause किंवा PCOD मुळे होणारे त्रास कमी होतात
  • काही आसनांमध्ये abdominal stretching होते. त्यामुळे insulin secretion होते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो
  • काही आसनांमध्ये chest expansion होते. ही आसने हृदयाचे आरोग्य आणि उच्च रक्तदाब यासाठी फायदेशीर ठरतात
  • आपण स्त्रिया खूप वेळ उभे राहून काम करतो. त्यामुळे होणारा vericose veins आणि पाय दुखण्याचा त्रास काही आसनांमुळे कमी होतो
  • पोट साफ न होणे, bloating जाणवणे यासाठी पवनमुक्तासन, मलासन या सारखी आसने फायदेशीर ठरतात
  • मानदुखी, कंबरदुखी, sciatica वर उपयुक्त आसने करून आपण हा त्रास कमी करू शकतो
  • Parasympathetic nervous system activate होऊन body relax होते. त्यामुळे शांत झोप लागते.
मात्र ही सर्व आसने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. 

प्राणायाम – प्राणायामाच्या माध्यमातून जेवढे जास्त प्राणशक्तीचे संचरण शरीरात होईल तेवढे आरोग्य चांगले राखले जाईल. ऋतूनुसार प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखालीच करावेत. 

सूर्यनमस्कार – वजन कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक ऊर्जा निर्माण करून तेजस्वी - ओजस्वी ठेवण्याचे काम सूर्यनमस्कारामुळे होते. 

ओंकार साधना – आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजणच तणावामध्ये  (stress)  असतो. ओंकार साधनेने आपण हा तणाव (stress level) नक्कीच कमी करू शकतो. 

चला तर मग, या योगदिनानिमित्त योगिक जीवनशैली अंगीकारून आपले सुंदर जीवन आपण आणखी निरोगी व सुंदर बनवूया. यामध्ये आपल्या कुटुंबाला व प्रियजनांना सामावून घेऊया. योग हा भारताचा ठेवा जपूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. 


 सौ. वैशाली गांधी,  
योग शिक्षिका, पुणे
 ९४२०३२१५०३

Related Posts:

  • Different approach towards the goal and resolutions  २०२२ संपून सुरु होईल नवीन वर्ष २०२३. वर्षभरातील अनेक हव्या नकोशा घटनांच्या आठवणींबरोबरच पिंगा घालू लागतात ते ध्येय (goal) आणि संकल्प (Resolut… Read More
  • रिफ्रेश बटणाच्या शोधात  २०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आ… Read More
  • गौराईआज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बो… Read More
  • मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी  स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या… Read More
  • योग: एक परिपूर्ण जीवनशैली२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. … Read More

0 comments:

Post a Comment

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment