अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया हा दीपोत्सव 🪔🪔🪔🪔🪔🪔
मंगलमय दिवाळी सुरू होते ती गोवत्स द्वादशी किंवा वसुबारसने. गाय वासरु वा कामधेनु म्हणजे मातृत्व.
दीपावलीचा पहिला दीप सात्विकतेचा व ममतेचा 🪔
धनत्रयोदशी धन्वंतरी पूजनाची. धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक, पहिले चिकित्सक.
दीपावलीचा दुसरा दीप आरोग्याचा व निरोगी आयुष्याचा 🪔
आरोग्यम् धनसंपदा !
अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी काम, क्रोध, अहंकार व राक्षसी वृत्तीच्या त्यागाची.
ज्ञानाचा व समृद्धीचा तिसरा दीप 🪔
अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाची. पैसे, सोने-नाणे या बरोबर पूजा होते ती अलक्ष्मीचा नाश करणाऱ्या केरसुणीची.
स्वच्छता व आर्थिक नियोजनाचा चौथा दीप 🪔
कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा विक्रम संवत्सराचा प्रारंभ. जल प्रदूषण, वायु प्रदूषण ते ध्वनि प्रदूषणात आपला काही प्रमाणात सहभाग आहेच. हेच विराट रूप धारण करून पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत.
जल, आकाश, धरती ही तीन पावले बटू वेशातील वामनाची. म्हणून प्रदूषण मुक्तीचा व क्षमाशीलतेचा पाचवा दीप 🪔
कार्तिक शुक्ल द्वितीया यमद्वितीया किंवा भाऊबीज. द्वितीयेचा चंद्र, बीजेची कोर वृद्धी दाखवणारी. द्वेष व असूयेचा त्याग करून बंधुभाव जागृत करणारी भाऊबीज.
निर्भयतेचा व प्रेम संवर्धनाचा सहावा दीप 🪔
ही दिपावली सात्विकता, ममता, आरोग्य, ज्ञान, समृद्धी, निर्मलता, समाधान, आर्थिक नियोजन, प्रदूषण मुक्ती, क्षमाशीलता, निर्भयता व प्रेम संवर्धनाचे हे दीप 🪔 आपल्या आयुष्यात आनंद व मांगल्याचा प्रकाश 💥घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏
सौ. स्नेहल कमलापूर
0 comments:
Post a Comment
Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment