News flashed "Among 1 lac 24 thousand 480 crore wealth of Indian women, Maharashtra remains at the top" on front page of Divya Marathi. Curiously I went through Kotak Private Banking Hurun Leading Wealthy Women list 2021. So I thought of sharing some interesting facts. In 2021, India’s 100 top active businesswomen, entrepreneurs and professionals are listed with cutoff of ₹ 300 crore as compared to ₹ 100 crore in 2020. The net wealth of these rich women is ₹ 4,16,970 crore which is 53% more than 2020. Out of these 22 featured in Hurun india and 8 in global rich list.
Rich Women Individuals as per Industry
85% women are from metro cities while 15% are from non metro cities. Around 24% of these rich women are from Maharashtra with 81% from Mumbai and 19% from Pune.
Moto of this blog is –“Inspire and get inspired by others”.
Age is no bar which is significant from the above survey. The average age being 55 ; 20% of them are below 40. Youngest rich woman is Kanika Tekriwal of JetSetGo. She is a resident of Bhopal with a net wealth of ₹ 420 crore. 31% are self made women and have 39% of combined wealth. 45% self made women are from Mumbai and New Delhi. New entry in rich self made women is Neha Narkhede with wealth of ₹ 13,380 crores. She is the co-founder of cloud company Confluent.
Falguni Nayar of Nayaka is richest among self made women. She quit the job at Kotak Mahindra Group, leaving “ideal life”. She has built an empire by taking a risk at the age of 50. Nayaka is the first Indian unicorn startup led by woman to launch IPO, an inspiring story indeed!
Follow your dreams
दिव्य मराठीच्या पहिल्या पानावर बातमी झळकली "१ लाख २४ हजार ४८० कोटींची संपत्ती निर्माण करणाऱ्या सर्वात श्रीमंत महिलांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक". कुतूहलाने मी "कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून लीडिंग वेल्थी वूमन लिस्ट २०२१" पाहिली. हा अहवाल नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असू शकेल. २०२१ मध्ये भारतातील १०० सक्रिय महिला व्यावसायिक महिला, उद्योजक आणि व्यावसायिकांची यादी प्रकाशित केली. २०२० मध्ये या यादीत ₹ १०० कोटीवर उत्पन्न असलेल्या महिलांचा सहभाग होता तर २०२१ मध्ये या यादीत ₹ ३०० कोटी उत्पन्न असलेल्या स्त्रिया आहेत. या श्रीमंत महिलांची निव्वळ संपत्ती ₹ ४,१६,९७० कोटी आहे जी २०२० च्या तुलनेत ५३% जास्त आहे. यापैकी २२ महिलांनी हुरुनने प्रकाशित केलेल्या भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे आणि ८ जणी जागतिक श्रीमंतांच्या यादीत आहेत.
उद्योगानुसार श्रीमंत महिला व्यक्ती
८५% महिला महानगरातील (मेट्रो शहरांतील) आहेत तर १५% इतर शहरांतील आहेत. यापैकी सुमारे २४% श्रीमंत महिला महाराष्ट्रातील असून त्यातील ८१% मुंबईतील आणि १९% पुण्यातील आहेत.
खरंच खूप प्रेरणा देणारी अशी ही आकडेवारी आहे. इथे कुठेही वयाचे बंधन नाही. या महिलांचे सरासरी वय ५५ असून २०% महिला या ४० वर्षाखालील आहेत. JetSetGo च्या कनिका टेकरीवाल ह्या सर्वात तरुण श्रीमंत भारतीय महिला आहेत . त्या भोपाळच्या रहिवासी असून त्यांची संपत्ती ₹ ४२० कोटी इतकी आहे. ३१% महिलांनी स्वतः व्यवसाय सुरु केलेला आहे त्यांची एकत्रित संपत्ती आहे या १०० महिलांच्या ३९% आहे. यातील ४५% महिला या मुंबई आणि दिल्लीमधील आहेत. या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवणाऱ्या महिलांमध्ये नेहा नारखेडे यांची संपत्ती आहे ₹ १३,३८० कोटी .
स्वतःचा व्यवसाय सुरु केलेल्या महिलांमध्ये Nayaka (नायका)च्या फाल्गुनी नायर सर्वात श्रीमंत आहे. कोटक महिंद्रातील सुखाची नोकरी सोडून धोका पत्करून वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. Nayaka ही IPO लॉन्च करणारी महिलांच्या नेतृत्वाखालील पहिली भारतीय युनिकॉर्न स्टार्टअप आहे.
स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
#FollowYourDreams
Disclaimer : Information is based on Hurun report. Weresilient does not guarantee the accuracy or completeness of information
Dr. Snehal Kamalapur
That's a very inspiring piece of information.
ReplyDelete