Friday, January 3, 2025

Avoid Mental Blocks: How to Focus Your Mind for Personal Growth

The interview conducted in 2017 by chess journalist Sagar Shah during a national chess tournament recently went viral after Gukesh achieved his dream of becoming the youngest World Chess Champion. Sagar asked him about his personal ambition and 11 year old Gukesh replied with remarkable clarity: "I want to be the youngest world champion." 


Fast forward to December 2024, and Gukesh has fulfilled that bold ambition, defeating Ding Liren in the World Chess Championship final. The viral interview became a symbol of the power of vision and dedication. Social media buzzed with admiration as how an 11-year-old’s dream, spoken with conviction, had become an 18-year-old’s reality. 

Believing in a goal and acting as if it's already achieved. Visualizing success and aligning thoughts with goals is manifestation. 

"Manifest" is the word of the year by Cambridge dictionary. Coincidentally, "Brain Rot" is word of the year by Oxford University Press. Manifest was first used in 1845 while Brain rot was used almost 170 years back. But the context has changed. There is an interesting connection between these two words: Obsession and intention. "Brain rot" and "Manifestation" can be interconnected through their implications in this digital world. 

Almost everyone wakes up with mobile in hand and thumb scrolls endlessly through social media. What might have started as a way to stay connected and has now turned into a trap. Every app Whatsapp to Instagram, Twitter to Tiktok to YouTube is designed to hold your attention. One meme after another, one short after another, one reel after another, never satisfying enough to stop, seconds to minutes to hours. Stream of the contents seemed to be tailored for you. 

Walking on the streets, in cafes, and even in homes, people are no longer looking at each other. Instead, their faces are illuminated by mobile screens. Notifications demand attention, pulling them into a loop of scrolling, liking, and consuming content, often leaving behind a sense of mental clutter and time lost. A quick scrolling of makeup tutorials, health, trending dance movements and life hacks in just 10 to 15 seconds. Most of the reels are for entertainment or promotion rather than to educate like a woman with glowing skin applying serums and text on the screen “This routine cleared my skin in 2 weeks!” One may try to compare oneself to creators and may lead to negative self image. Reels are designed to be addictive and it is easy to lose track of time. This may lead to a reduced time span for other meaningful tasks. 

Excessive exposure to repetitive or unchallenging content, especially online, often describes the feeling of mental fatigue. There is a possibility of a decline in cognitive function from overconsumption of things like mindless media, memes or distractions. 

Reels may inspire you at times but overuse without mindfulness may lead to brain rot. Brain rot refers to an obsessive preoccupation with a particular topic, idea, or content, often fueled by excessive exposure to online media. 

Technology isn’t the enemy—it’s how we use it. Online environment can blur the lines between intentional focus (manifest) and obsession (brain rot). 

Let us turn fixation into action. Focusing thoughts, energy and intentions on a desired outcome to bring it into reality, often rooted in ideas of mindfulness or the law of attraction. Let us consume the online content consciously and remember there is life beyond the screen.

Have a Great Year !!!


वयाच्या ११ व्या वर्षी आत्मविश्वासाने "मला सर्वात तरुण जगज्जेता व्हायचे आहे". सांगणाऱ्या गुकेशची क्रीडा पत्रकार सागर शहा याने २०१७ मध्ये ११ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता गुकेशची घेतलेली मुलाखत सध्या सर्वत्र viral होत आहे. गुकेशने त्यानंतर ७ वर्षानी, वयाच्या १८व्या वर्षी १२ डिसेंबर २०२४ ला डिंग लिरेनला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत हरवून सर्वात तरुण जगज्जेता होण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. हे शक्य झाले ते त्याच्या जिद्दीमुळे आणि त्याने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे. 

आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेऊन, ते ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करणे म्हणजे मॅनिफेस्ट. अगदी ओम शांति ओम मधील शाहरुख खानच्या डायलॉग "अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है!" 

”मॅनिफेस्ट” हा केंब्रिज शब्दकोशाचा यावर्षीचा शब्द आहे असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस चा यावर्षीचा शब्द आहे “ब्रेन रॉट”. हे दोन्ही शब्द अजिबात नवीन नाहीत. मॅनिफेस्ट हा शब्द ई.स. १८४५ मध्ये जॉन ओ'सुलिव्हन यांनी हा शब्द प्रथम वापरला होता. ब्रेनरॉट हा शब्द खरंतर १७० वर्षांपूर्वी हेन्री डेव्हिड थोरोच्या "वाॅल्डन" या पुस्तकात वापरला होता. सध्या मात्र अगदी वेगळ्याच संदर्भात वापरला जात आहे. 

मॅनिफेस्ट व ब्रेन रॉट हे दोन जरी वेगळे शब्द असले तरी त्सध्याच्या डिजिटल युगात या दोन्ही शब्दांचा परस्पर संबंध दिसतो. मॅनिफेस्ट, “मॅजिकल थिंकिंग”, म्हणजेच एखादी गोष्ट झालीच आहे असा विचार करत, जिद्दीने धडपडून प्रयत्नातून स्वप्नांपर्यंत पोहोचणे, तर ब्रेन रॉट, “नो थिंकिंग”, कसलाही विचार न करता एखादी गोष्ट करत राहणे. 

आपल्या आजूबाजूला, रस्त्यावर, कॅफेत, जॉगिंग ट्रॅक आणि अगदी घरातही जवळजवळ सगळेच सकाळी उठल्यापासून हातात मोबाईल घेऊन सतत समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) वेळ घालवताना दिसतात. सुरुवातीला फक्त एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेला सोशल मीडियाचा वापर आपल्याला कधी त्याच्या विळख्यात घेतो हे समजतच नाही. व्हाट्सॲप ते इंस्टाग्राम पर्यंत ट्विटर पासून ते टिकटॉक किंवा यूट्यूब पर्यंत सर्वच ॲप हे आपल्याला सोशल मीडियाच्या व्यसनात अडकवून टाकण्यासाठीच तर तयार केलेले आहेत असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. स्क्रोल करा, लाईक करा आणि शेअर करा यात आपण इतके अडकून जातो की कशाचेच भान राहात नाही. मीम्स, यूट्यूब शॉर्टस् एकानंतर एक येतच राहतात व काही सेकंदापासून ते कितीतरी तास आपल्याला जखडून टाकतात. 

नितळ त्वचेची स्त्री, ती लावत असलेले सिरम आणि त्याखाली लक्ष वेधणारा संदेश "दोन आठवड्यात अशी त्वचा होण्यासाठीची दिनचर्या" यासारखे रील्स, १० ते १५ सेकंदाचे मेकअप ट्युटोरियल्स, आरोग्य, ट्रेंडिंग डान्स मूव्हमेंट्स आणि लाइफ हॅक्स आपल्याला स्क्रोलिंग करायला उद्युक्त करतात. एका रीलवर क्लीक करताच तशाच रील्सचा भडीमार सुरु होतो. रील्स प्रामुख्याने मनोरंजन किंवा जाहिरातीसाठी असतात. काहीजण तर स्वत:ची तुलना त्या रीलमधील व्यक्तीबरोबर करून स्वतःची नकारात्मक प्रतिमा तयार करतात. 

एकानंतर एक येत राहणारे मीम्स, रील्स, यूट्यूब शॉर्टस् पाहणे आपल्या मेंदूसाठी सतत जंक फूड खाण्यासारखं आहे. बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक नसलेलं ऑनलाइन कंटेंटच्या अतिरेकाने निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी होऊन मानसिक थकवा येतो. 

तंत्रज्ञान आपला शत्रू नाही, पण तंत्रज्ञान आपण कसे वापरतो हे महत्त्वाचे. सध्याच्या ऑनलाईन वातावरणात मॅनिफेस्ट आणि ब्रेन रॉट मधील सीमारेषा अस्पष्ट होताना दिसते. २०२४ चे सर्वात जास्त वापरले जाणारे शब्द, २०२५ साठी आपल्याला ऑनलाइन गोष्टी जागरूकतेने पाहू या असेच तर सांगत नाही ना कारण मोबाइल स्क्रीनच्या पलीकडेही एक सुंदर जीवन आहे.


Dr. Snehal Kamalapur

Read More

Saturday, June 22, 2024

Understanding HPV Vaccination: Safeguarding Health Together

Amayra is a fitness enthusiast in her mid-thirties. She balanced her job with a workout routine and a diet. She never missed her annual check-up. But life always has a twist in store.  When she sat in the waiting room flipping through a magazine, during regular annual checkup,  she couldn’t have imagined life-changing news that awaited her. 

She got a call from her doctor about the pap smear test and recommended further investigation. She sensed a concern, words like “biopsy” and “HPV” swirled around her. Further test results confirmed her worst fears—she had cervical cancer. It was a journey of fear and hope for her. “How could this happen to me?” "Why me?" she wondered as she had always been careful about her health. The doctor explained that it often begins as a human papillomavirus (HPV) infection. For most women, such infections resolve on their own, but in some cases, it may lead to cancer. The doctor started a treatment. 

During her recovery, she met other women battling with cervical cancer. 

Lakshmi lives in Rajokri village, about 45 km from Delhi. She runs her household by selling milk and is the sole breadwinner in her family. She was experiencing constant pain and itching in her pelvic area but was not able to consult a doctor due to lack of medical facilities in her village [1]. 

CAPED (Cancer Awareness Prevention and Early Detection) Trust had arranged a screening camp which was free of cost. Local members from the community went door-to-door explaining the importance of an early detection test for cervical cancer. Further investigations were recommended for Lakshmi. Because of screening and early treatment, she has recovered and now urges women not to be ashamed of health issues. Talk about it with someone before it’s too late. 

Sangeeta Gupta, a publisher, was shocked when diagnosed with cervical cancer [2]. She has successfully fought her battle with cervical cancer. It was an emotionally exhausting experience for her. A positive approach and family support helped her to bounce back. She has spoken openly about her cancer with others though there is social stigma attached to cervical cancer. She started the journey of educating women about screening tests and the HPV vaccine. 

The stories of survivors may vary but they all share resilience and hope. 

Cervical cancer remains a significant public health issue worldwide[3]. Current estimates indicate that every year 123907 women are diagnosed with cervical cancer and 77348 die from the disease. [4] It is necessary to spread awareness of regular screenings, and life-saving potential of the HPV vaccine. So I thought of sharing my discussion with Dr. Vaidehi Lomte, a gynecologist to know more about cervical cancer, screening and vaccination. 

What is Cervical Cancer? 
Cervical cancer originates in the cells of the cervix, the lower part of the uterus that connects to the vagina. It typically develops over several years, starting with pre-cancerous changes known as cervical intraepithelial neoplasia (CIN). If left untreated, these abnormal cells can progress to invasive cancer. 

What are Causes and Risk Factors? 
The primary cause of cervical cancer is persistent infection with high-risk types of the human papillomavirus (HPV). HPV is a common virus transmitted through sexual contact. Although most HPV infections resolve on their own, chronic infection with high-risk strains can lead to cervical cancer. 
Key risk factors include
  • HPV Infection: The most significant risk factor
  • Smoking: Doubles the risk of cervical cancer. 
  • Immunosuppression: Weakened immune system, such as in HIV-infected individuals.
  • Long-term use of oral contraceptives: Linked to a higher risk of cervical cancer. 
  • Multiple full-term pregnancies: Associated with an increased risk. 
  • Family history: Genetics can play a role in susceptibility.
What are the Symptoms? 
In its early stages, cervical cancer often does not present noticeable symptoms. 
As the disease progresses, symptoms may include-
  • Abnormal vaginal bleeding (post-coital, intermenstrual, or postmenopausal) 
  • Unusual vaginal discharge 
  • Pelvic pain Pain during intercourse 
These symptoms can be caused by other conditions, but it is crucial to seek medical advice for proper diagnosis and treatment. 

Is it possible to prevent it? 
Preventing cervical cancer involves multiple strategies like screening, vaccination etc. 
  • HPV Vaccination: HPV Vaccines protect against the most common cancer-causing HPV strains. The vaccine is most effective when administered before individuals become sexually active. 
  • Regular Screening: Pap smears and HPV tests can detect precancerous changes in cervical cells. Early detection through screening is essential for successful Cervical cancer is largely preventable and, when detected early, highly treatable. Public health efforts focusing on vaccination, regular screening, and 
  • Education about safe sexual practices and smoking cessation are crucial in reducing the incidence and mortality rates of this disease. 
By increasing awareness and access to preventive measures, we can ensure better health outcomes for women worldwide. 

References-
  1. https://www.youtube.com/watch?v=h8vLfDqq594
  2. https://www.youtube.com/watch?v=IpDk1ONdZS8
  3. https://www.bbc.com/news/health-44494377
  4. https://hpvcentre.net/statistics/reports/IND.pdf?t=1713590454130
  5. https://www.youtube.com/watch?v=2x278gBbpok 
  6. https://togetherforhealth.org/india-faces-of-hope/

Dr. Snehal Kamalapur
Read More

Friday, March 8, 2024

कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर

 

 

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक, डॉक्टर व अनेक मान्यवर यांच्यासमोर आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मायाशी माझी भेट झाली. या भेटीतून तिच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची बाजू समोर आली. एक अशिक्षित स्त्री काय करू शकते हे समजावे, तिचा संघर्ष सर्वांना समजावा, स्वतःजवळ काहीही नसताना कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर असा पल्ला गाठणाऱ्या मायाबद्दल महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला सांगण्याचा हा प्रयत्न. 

तेराव्या वर्षी लग्न, अल्लड वयात चौदाव्या वर्षी पहिले मूल आणि हे कमी की काय म्हणून अंगावर पडलेली आर्थिक जबाबदारी. एखादी सुशिक्षित व्यक्तीसुद्धा खचून गेली असती पण माया मात्र याला खंबीरपणे सामोरी गेली. शेजारपाजारी सगळ्या कचरा गोळा करणाऱ्या बायका त्यामुळे साहजिकच मायाने पण शहरात कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कसेबसे दिवसाला वीस रुपये मिळत. 

अलायन्स ऑफ वेस्ट पिकर (Aliance of Waste Picker, AIW) एक लाख कचरा वेचकांचे प्रतिनिधित्व करते. या अलायन्समधील कागद काच पत्र कष्टकरी पंचायत, पुणे ही एक सदस्य संस्था. या संस्थेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात मनापासून काम करत 60 कचरावेचक महिलांना ओळखपत्र मिळवून देत मायाने आपली खास ओळख निर्माण केली. 2010 मध्ये AIW ने भारतातून तीन कचरा वेचकांना तियानजिन, चीन येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यात मायाचा समावेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून आपली मतं मांडण्याची मिळालेली संधी तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांनी तिच्यावर जणू जादूच केली. निरक्षर असलो तरी जर आपल्या हातात कॅमेरा आला तर आपले प्रश्न आपण लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवू शकतो याची तिला जाणीव झाली. अभिव्यक्ती या स्वयंसेवी संस्थेकडून व्हिडिओग्राफीच्या मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तिचे जीवनच बदलून गेले.

आरोग्य, सामाजिक विषमता, पाणी प्रश्न, घरकाम, कचरावेचक महिलांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवरील माहितीपटांद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून उत्तम समुदाय पत्रकार म्हणून आपली ओळख मायाने निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता कोणतेही प्रशिक्षण न घेता मायाने कॅमेरा असिस्टंटपासून ते फिल्म मेकिंगपर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडल्या. 

मोहाची फुले म्हणजे दारू असे समीकरण पण त्यात औषधी गुणही तेवढेच आहेत. याच मोहाच्या फुलापासून लाडू, गुलाबजाम आणि एनर्जी पावडर अशी विविध उत्पादने तयार करण्यासाठी मायाने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांना एकत्र आणून आपली उत्पादने बाजारात आणली. 

विविध सामाजिक उपक्रमांसाठी मायाने श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या अंतर्गत वस्त्यांमध्ये जाऊन महिलांना एकत्र आणून डिस्कशन क्लब सारखे उपक्रम राबविले, शासनाशी सामाजिक प्रश्नांवर पत्रव्यवहार केला व यातून सामाजिक विकासाची चळवळ पुढे चालू ठेवली. 

गावकऱ्यांचे प्रश्न मांडता यावेत त्यासाठी मायाला आजूबाजूच्या गावांना भेटी देणे सोयीचे व्हावे, तिच्या सामाजिक कार्याला मदत व्हावी म्हणून सायरस पुनावाला यांनी तिला कार भेट देऊन तिचा सन्मान केला.   मायाच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत बेस्ट इम्पॅक्ट व्हिडिओ अवॉर्ड, राजमाता जिजाऊ सन्मान, नारी सन्मान, सावित्रीबाई फुले पुरस्कार, महिला गौरव पुरस्कार, नवदुर्गा सन्मान, भाई नावरेकर स्मृतिदिन विशेष सन्मान, कर्मयोगीनी पुरस्कार देत विविध संस्थांनी तिचा सन्मानही केला आहे. 

मायाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! शिक्षण घेण्याची तिची इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा ! 
नारीशक्तीस सलाम !!! Happy Women's Day!!!

I recently had a chance to meet Maya. She was speaking confidently in a cultural program attended by many entrepreneurs, physicians and renowned personalities. I had a brief chat with her to understand the challenging journey of an illiterate lady from a ragpicker to a journalist, social worker and a filmmaker. On the occasion of International Women's Day, I would like to share this inspiring story with you all. 
Maya got married when she was 13 and had her first child at the age of 14. Most of the ladies in her neighborhood were ragpickers. Maya also started as a rag picker to support her family. In those days, she earned hardly 20 rupees per day. 

Alliance of Waste Pickers (AIW) represents about 1 lakh ragpickers. Kaagad Kaach Patra Kashtakari Panchayat (KKPKP), Pune is a member organization of AIW. Maya started working with KKPKP’s Nashik Road office and was instrumental in arranging identity cards for 60 lady ragpickers. In 2010, AIW sponsored Maya and 2 other ragpickers to attend “UN Climate Change Conference” held at Tianjin, China. Representing India on a global platform and getting introduced to videography was a turning point in Maya’s life. She realized the power of camera & creating short films to effectively spread awareness about various problems to society & the government. On her return from the conference, she attended a training course in videography conducted by an NGO, Abhivyakti. Maya has created many short films addressing various problems faced by ragpickers and household workers. 

Encouraged by the response, she expanded her horizon to issues pertaining to health, social inequality and water scarcity. In this process she performed various roles from camera assistant to a filmmaker and established herself as a video journalist. 

Moh (Mahua) flowers are often seen as raw material for making Moh liquor. However Moh flowers have many medicinal properties. Maya encouraged tribal women from Peth Taluka in Nashik District to collect the flowers and prepare various products like Energy Powder and Sweets like Ladu & Gulabjamun. This has provided employment and opportunity to earn money to the tribal women. 

Maya has started Shramajivi Mahila Samajik Sanstha to protect the rights of unorganized women workers. The sanstha works towards better healthcare facilities for farmers, promoting quality education for their children and fostering skill development programs. 

Impressed by her initiative, Dr. Cyrus Poonawalla gifted Maya a car for easy commuting from village to village to help villagers around Nashik. Maya has received many awards like Best Impact Video Award, Rajmata Jijau Award, Nari Sanman, Savitribai Phule Award, Mahila Gaurav Award, Navdurga Award, Bhai Navrekar Memorial Award and Karmayogini Award to name a few. 

Best wishes for her future journey. May her wish to get formal education be fulfilled soon. 

Happy Women's Day!!!

#InvestInWomen


Dr. Snehal Kamalapur

Read More

Monday, January 1, 2024

रिफ्रेश बटणाच्या शोधात

 


२०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आहे. काही तर्कशुद्ध वाटणाऱ्या गोष्टी तर्कहीन वाटायला लागल्या आहेत. वास्तविकता आणि आभास यातील सीमारेषा खरंच धूसर होत असल्याचे जाणवायला लागलं आहे . 

इथे तर शब्दांचे अर्थही बदलायला लागले आहेत असा विचार येत असतानाच हातात पडले ते सत्या नाडेला यांचे हिट रिफ्रेश.

ब्राउझरचं रिफ्रेश बटन दाबल्यावर त्याचा काही भाग तसाच राहतो आणि काही भाग नव्याने दाखविला जातो. यातूनच बिल गेट्स यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाची समर्पकता दाखवली आहे. ही गोष्ट खरंतर पुस्तकाच्या नावासाठीच नाही तर आपल्या जीवनासाठी पण किती समर्पक आहे; नाही का? काही गोष्टी आहे तशाच चालू ठेवाव्यात पण काही मात्र बदलाव्यात. क्रिकेट आणि संगणक या दोन्ही गोष्टी नाडेलांच्या आवडीच्या. बारावीत असताना हैदराबादकडून क्रिकेट खेळून बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणारे नाडेला. आवडत्या गोष्टी केल्या की आनंदाबरोबरच यशही मिळते हे आईचे; तर मोठी स्वप्ने पाहून ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे वडिलांचे विचार या दोन्हींची सांगड घालून रिफ्रेश बटन हिट केले आणि इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळे टप्पे पार करत मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ झाले. खरंच शोधावं का रिफ्रेश बटन या वर्षात. 

“At the core, Hit Refresh is about us humans and the unique quality we call empathy, which will become ever more valuable in a world where the torrent of technology will disrupt the status quo like never before.” – Satya Nadella from Hit Refresh


रिफ्रेश बटन शोधत असतानाच मॉर्गन हाऊसेल यांचे सायकॉलॉजी ऑफ मनी पुढील वर्षासाठीच नाही तर आयुष्यासाठीचे तत्त्वज्ञान देऊन गेले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली स्वप्ने किंवा गरजा वेगवेगळी असू शकतात. त्यासाठी बदल हा स्वाभाविक आहे, तो स्वीकारा आणि पुढे जा; हेच तर जीवन. पैशाचे मानसशास्त्र समजावताना जीवनाचे सारच मांडले आहे मॉर्गन हाऊसेलनी. गरज आणि इच्छा यातील फरक कळणे महत्त्वाचे. कधी, काय आणि का हवे ते समजले तर आयुष्य सोपे होईल. 

अर्थात अचानक गोष्टी घडतात आणि सर्व ठरवलेले बिघडून जाते. 

“You can’t control surprises, but you can control how you prepare for them.” 

"Planning is important, but the most important part of every plan is to plan on the plan not going according to plan."
-Morgan Housel from The Psychology of Money 

आपण ठरवतो एक आणि घडते वेगळेच. अगदी मागच्या महिन्यापासून ठरवत होते, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मस्त कुठेतरी दोन-तीन दिवस निवांत जाऊन येऊ. पण अचानक अशा घटना घडल्या आणि वर्ष सुरु व्हायच्या आधीच plan चौपट झाला. पण लेट इट गो

'लेट गो' किंवा सोडून दे, परत करू की plan असं मनाला समजवायचं. अर्थात शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हे गरजेचे वाटते आहे. नवीन वर्ष नव्या संधी आणि नवीन आव्हाने घेऊन येईल. लेट गो च्या यादीत नवीन गोष्टी येत रहातील. प्रत्येकाला आपल्यासाठी आपलं रिफ्रेश बटन शोधावे लागेल.



डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Sunday, October 1, 2023

गौराई


आज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बोलू जरा. आमच्या येण्याने तुम्हा बायकांना अगदी उसंत मिळत नाही. आमच्या तरी किती तर्‍हा. तुझ्याकडेच बघ एक येते श्रावणात शुक्रवारी आणि दुसरी भाद्रपदात. काही जणी सुगडावर, काही उभ्या, काही तांब्यावर, काही पानांवर तर काही खड्यांच्या अशा वेगवेगळया पद्धती. त्याबरोबरच ते साग्रसंगीत जेवण. पुरणपोळ्या, सोळा भाज्या, कोशिंबिरी, चटण्या आणि करंज्या, लाडू, अनारशासारखे फराळाचे पदार्थ. कदाचित हे पूर्वापार चालत आले किंवा या हवामानात सर्व भाज्या चांगल्या मिळतात किंवा सर्व रस आपल्या जेवणात असले तर ते स्वास्थ्यवर्धक असते म्हणून असावे. खरंतर सध्याच्या जमान्यात हे रुचकर पदार्थ योग्य पद्धतीने केले तर गप्पा मारायला आलेल्या मैत्रिणींना पटकन देता येतील म्हणून हे फराळाचे पदार्थ असावेत. या निमित्ताने तुम्हा मैत्रिणींना छान सजून एकमेकींकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारता येतात. पण बर्‍याच वेळा सर्वच गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. त्यामुळे तुम्हा बायकांची खूपच धावपळ होते. आपल्याला जमेल तसे मनोभावे करावे. 

बाकी तुझे Women networking कसे चालले आहे? महिला सक्षमीकरण झाले तर त्या समर्थपणे आणि सजगतेने जबाबदारी पेलू शकतात हा जी-२० परिषदेचा आणि तुझा अजेंडा सारखाच आहे की. त्यासाठी महिलांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-२० परिषदेने उचललेले पाऊल अगदी योग्यच वाटलं. 

शैक्षणिक प्रगती बरोबर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. अर्थात मुलगी शिकली की प्रगती होतेच पण निर्णय प्रक्रियेत जर महिलांचा सहभाग असेल तर सामाजिक विकास नक्कीच लवकर होऊ शकतो. मंगलयान, चांद्रयान आणि आदित्य एल 1 या सर्व अंतराळ मोहीमा यशस्वी करण्यासाठी स्त्री स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

सध्या जागतिक स्तरावर ज्या समस्यांना सामोरे जात आहोत त्यामध्ये हवामान बदल आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मध्ये जी-२० परिषदेमध्ये सुचविल्याप्रमाणे सायबर सुरक्षेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आणि ते राबविण्यात महिलांचा सहभाग असणे आवश्यकच आहे. तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जावीत यासाठी महिलांकडे नेतृत्व असणे गरजेचे वाटते. अगदी छोटसं उदाहरण घेतलं तर हे लक्षात येईल, घरात प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याचा निर्णय महिलांनी घेतला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे जगाला पटलेले असून समाजाच्या सर्व क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यासाठी नारीशक्ती नक्कीच प्रभावी ठरेल. सध्या फक्त १० टक्के महिला सक्रिय राजकारणात आहेत. महिलांनी राजकारणात यावे यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असं वाटतं. 

वित्तीय प्रणालीमध्ये महिलांच्या समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर असायला हवे. याची सुरुवात अगदी शाळेत असल्यापासून होऊ शकते. म्हणूनच आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून गुंतवणूक करणार्‍या तुझ्या मुलीचे खरंच कौतुक वाटलं. "आई मी घेतलेला शेयर ११० टक्के वाढला, अजून घ्यायला हवे होते. क्रिकेट वर्ल्ड कप भारतात आहे तेव्हा हॉटेल किंवा ऑन लाईन फूड डिलिव्हरी शेयरच्या किमती वाढू शकतील का?" अशी तुमची चर्चा ऐकून छान वाटलं. 

अष्टावधानी असावे हे म्हणणे सोपे आहे पण निभावून नेणे तेवढेच अवघड . वेगवेगळया आघाड्यांवर लढताना ताणतणावांकडे, लक्ष द्यायलाच हवे. यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकडे मात्र तुम्ही बायका दुर्लक्ष करता. आहार, विहार आणि शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक स्वास्थ्य तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. स्वतःसाठी वेळ दे, स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष दे व एखादा छंद जोपास. 

निरोगी व सुखासमाधानात रहा हाच आमचा शुभाशीर्वाद !!! 


सौ. स्नेहल कमलापूर


Read More

Friday, August 18, 2023

मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी

 



स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या पगाराचे प्रत्येकाकडून पत्र घेऊन घर घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून बॅंकेत निवेदन देणारी एक कष्टकरी महिला. एकीने घरच्या जबाबदाऱ्यासाठी नोकरी सोडली तर दुसरीने नोकरी करून घरची जबाबदारी घेतली. त्याचवेळी डोळ्यासमोर आलं ते विद्या बाळ आणि मेधा राजहंस यांनी संपादित केलेलं "मिळवतीची पोतडी" हे पुस्तक. 

या  पुस्तकाच्या प्रस्तावनेत विद्या बाळ म्हणतात, "पोतडी आणि अलिबाबाची गुहा उघडली की काय बाहेर येईल सांगता येत नाही". खरंच "मिळवतीची पोतडी" तून बाहेर पडतात ते अनुभवाचे बोल. 

मिळवती म्हणजे पैसा मिळवणारी असा खरंतर मर्यादित अर्थ. तो तसाच असावा का असाही प्रश्न पडतोच. 

अचानक मोहन गोखले हे जग सोडून गेल्यावर सुन्न झालेल्या स्वतःशीच लढून जिंकलेल्या शुभांगी गोखले. 
नोकरी, लेखन व अभिवाचन करून सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकरांची मुलगी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची आई याशिवाय वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वीणा देव. 
मजा म्हणून लॅक्मे साबणाचे मार्केटिंग, वर्तमानपत्रातील लिखाण व त्यानंतरची शिक्षण क्षेत्रातील नोकरी सोडून वर्ल्ड बँक प्रोजेक्टवर काम करताना शिक्षण क्षेत्रातील संलग्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगल्भ अनुभव असणाऱ्या व प्रकाश जावडेकरांची पत्नी याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्राची जावडेकर. 

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. या बरोबरच कष्टकरी, नोकरी करणाऱ्या, नोकरी देणाऱ्या, पत्रकार, लेखिका, व्यवसाय करण्याऱ्या स्त्रियांपासून ते सामाजिक कार्य करणाऱ्या विविध स्तरातील मिळवत्या स्त्रियांची मिळवतीची पोतडी म्हणजे अनुभवाची समृद्धी आणि प्रगल्भतेचं अवकाश. 

मिळवतीच्या पोतडीत असलेल्या आर्थिक स्थैर्याच्या बटव्यात समाधान, स्वास्थ्य व प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची वाटतात. येथे आहे ती धावपळ, शिस्त व सहनशीलतेच्या रेशीम धाग्यांनी गोफ विणत येणारी समृद्धी. 

साधारण २२-२३ वर्षांपूर्वीचा मिळवतीचा काटेरी मुकुट अजूनही बऱ्याच जणींसाठी तो काटेरीच आहे हे नक्की. जगण्यासाठीचा मोठा परीघ आखताना भावनिक गुंतणं, कोसळणं जाणवत राहतं. राग, लोभ, संघर्ष, रुसवे-फुगवे आणि असहकार या काट्याकुट्यातून, अपराधी न समजता वेगवेगळी नाती निभावून नेताना आयुष्याचा महत्वाचा टप्पा कधी पार होतो हेच समजत नाही. 

अर्थात हा जमाखर्च मांडताना अनुभवाची समृद्धी, सुसंगत विचार करण्याची ताकद, निर्णय क्षमता, आत्मविश्वास व आत्मभान यातून मिळणारे बौद्धिक समाधान आणि स्वातंत्र्य मिळवतीच्या या पोतडीतून डोकावतात.



डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Wednesday, June 21, 2023

योग: एक परिपूर्ण जीवनशैली

Yoga for Humanity



२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. 

योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. २५०० वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी 'पातंजल योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे. ते म्हणतात, 'योग:श्चित्तवृत्ती निरोध:'. म्हणजेच चित्ताची चंचल वृत्ती कमी करून मन शांत व संतुलित ठेवून आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो तो योग. या आध्यत्मिक उन्नतीकडे जाताना शारीरिक आरोग्य सांभाळणेही अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी ऋषी-मुनींनी आपल्याला आसन आणि प्राणायाम ही दोन महत्त्वाची साधने दिली आहेत. 

आसन – आसन म्हणजे 'कर चरण संस्थान विशेष:' हात व पायांची केलेली विशिष्ट रचना म्हणजे आसन. ते स्थिर आणि सुखकारक हवे. 

आसनात येणारे विशिष्ट ताण, दाब आणि पीळ यामुळे अनेक फायदे मिळतात. 
  • शरीर अत्यंत लवचिक बनते
  • स्नायूंचा tone सुधारतो. शरीरातील toxins बाहेर पडायला मदत होते
  • रक्ताभिसरण (blood circulation) सुधारते
  • डोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा योग छान काम करतो
  • योगासनांमुळे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. यामुळे मनावरचा ताण कमी होऊन quality output आपण देऊ शकतो
  • शरीरातील अनेक hormones चे संतुलन होते व त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी, menopause किंवा PCOD मुळे होणारे त्रास कमी होतात
  • काही आसनांमध्ये abdominal stretching होते. त्यामुळे insulin secretion होते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो
  • काही आसनांमध्ये chest expansion होते. ही आसने हृदयाचे आरोग्य आणि उच्च रक्तदाब यासाठी फायदेशीर ठरतात
  • आपण स्त्रिया खूप वेळ उभे राहून काम करतो. त्यामुळे होणारा vericose veins आणि पाय दुखण्याचा त्रास काही आसनांमुळे कमी होतो
  • पोट साफ न होणे, bloating जाणवणे यासाठी पवनमुक्तासन, मलासन या सारखी आसने फायदेशीर ठरतात
  • मानदुखी, कंबरदुखी, sciatica वर उपयुक्त आसने करून आपण हा त्रास कमी करू शकतो
  • Parasympathetic nervous system activate होऊन body relax होते. त्यामुळे शांत झोप लागते.
मात्र ही सर्व आसने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. 

प्राणायाम – प्राणायामाच्या माध्यमातून जेवढे जास्त प्राणशक्तीचे संचरण शरीरात होईल तेवढे आरोग्य चांगले राखले जाईल. ऋतूनुसार प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखालीच करावेत. 

सूर्यनमस्कार – वजन कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक ऊर्जा निर्माण करून तेजस्वी - ओजस्वी ठेवण्याचे काम सूर्यनमस्कारामुळे होते. 

ओंकार साधना – आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजणच तणावामध्ये  (stress)  असतो. ओंकार साधनेने आपण हा तणाव (stress level) नक्कीच कमी करू शकतो. 

चला तर मग, या योगदिनानिमित्त योगिक जीवनशैली अंगीकारून आपले सुंदर जीवन आपण आणखी निरोगी व सुंदर बनवूया. यामध्ये आपल्या कुटुंबाला व प्रियजनांना सामावून घेऊया. योग हा भारताचा ठेवा जपूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. 


 सौ. वैशाली गांधी,  
योग शिक्षिका, पुणे
 ९४२०३२१५०३
Read More

Wednesday, March 8, 2023

डिजिटल तंत्रज्ञान आणि महिला !




काय गं कोणत्या गहन प्रश्नावर एवढा विचार करते आहेस ? 
अगं स्वतःला दोष देते आहे एवढे कसे माझ्या लक्षात आले नाही. मेसेज वर आलेल्या लिंक वर क्लिक करायचे नाही, डिजिटल पेमेंट करताना व्यवस्थित शहानिशा करायची , नेट transaction करण्यासाठीही लिमिट ठेवले आहे असे असून ही मैत्रिणीचा व्हॉट्सॲप मेसेज आला म्हणून पैसे पाठवून मोकळी झाले. दोन तीन वेगवेगळ्या नंबर वरून तिचा मेसेज पाहून शंका आली म्हणून फोन करून विचारले तेव्हा तिचा मोबाइल हॅक झाला असून त्या नंबरचे सगळे मेसेजेस डिलिट  झाल्याचे लक्षात आले. जर दोघींनीं two step verification केले असते तर कदाचित दोघींना त्रास झाला नसता. 

छोट्याश्या गोष्टीमुळे मोठ्या आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

W20 आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nation) चे उद्दिष्ट डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे तसेच स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हे आहे. सध्या G20 चे नेतृत्व भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी करत असून W20 हा G20 चा अधिकृत गट आहे. या गटाने महिला उद्योजकता, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे, महिलांचे शिक्षण व कौशल्य विकास आणि वातावरण बदल या पाच महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षीची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक महिला दिनाची theme ही अगदी मिळतीजुळती आहे "DigitALL: Technology and innovation for gender equality".

डिजिटल तंत्रज्ञान हे व्यवसाय आणि समाजाच्या केंद्रस्थानी आहे. महिला सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम बनते. 

डिजिटल तंत्रज्ञानाने तसेच Information and Communication Technology (ICT) च्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे, आपले उत्पादन विकणे, चांगली नोकरी मिळवणे, शिक्षण घेणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे, आर्थिक व्यवहार, सामाजिक कार्यात सहभाग तसेच माहीती मिळवणे यासारख्या किती तरी गोष्टी शक्य आहेत. यामध्ये शहरी व ग्रामीण महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी गरजेची आहे ती डिजिटल साक्षरतेची. डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्याने महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

डिजिटल वापरातील संधीमधील लिंगभेद हा फक्त मोबाइल किंवा इंटरनेट माहिती दळणवळण /तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचा नसून बऱ्याच गोष्टीं मधील महिला व पुरुष यांच्या तफावतीतील आहे डिजिटल साधनांचा , तंत्रज्ञानांचा वापर आणि कौशल्यातील तफावत, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील शिक्षणातील तफावत, तंत्रज्ञानातील नेतृत्व तसेच उद्योगजकतेतील तफावत ही काही उदाहरणे देता येतील. पण हे सर्व तर उपलब्ध आहे असा विचार नक्कीच आपल्या मनात आला असेल. मात्र लिंगाधारित डिजिटल विभाजन निर्देशांक (The Gender Digital Divide Index (GDDI) ) पाहिला तर फक्त ५७% महिला इंटरनेट चा वापर करतात. हा अहवाल बनवताना वेगवेगळ्या उत्पन्न गटातील देश विचारात घेतले आहेत. यामध्ये भारत, ब्राझील, चिली, चीन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इजिप्त, इथिओपिया, हैती, मेक्सिको, नायजेरिया, रशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, ताजिकिस्तान, युगांडा, युक्रेन, युनायटेड स्टेट्स, व्हिएतनाम या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

Deloitte च्या अंदाजानुसार, 2019 ते 2022 पर्यंत एकूण जागतिक तंत्रज्ञान कार्यबलामध्ये महिलांचा वाटा 6.9% , आणि तांत्रिक भूमिकांमध्ये त्यांचा वाटा 11.7% ने वाढला असला तरी हे तंत्रज्ञानातील महिलांचे प्रमाण अगदीच कमी आहे म्हणजे साधारण २५% आहे. 

GDDI हा तीन निर्देशक श्रेण्यातील ३० वेगवेगळ्या गोष्टींवर आधारीत असून ह्यात 
  1. पायाभूत सुविधा - इंटरनेट कव्हरेज, आर्थिक दृष्ट्या परवडणारी पायाभूत सुविधा,माहिती संरक्षण, सायबर सुरक्षेसाठी धोरणे तसेच आरोग्य व कामगारातील संधीमधील लिंगभेद दोन शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) 
  2. सक्षम धोरण व अंमलबजावणी- डिजिटल समावेशकता, पारदर्शकता आणि डिजिटल कौशल्यां साठी असलेली सरकारी धोरणे आणि उपक्रम व त्या द्वारे होणारी प्रगती 
  3. वास्तविकता /परिणाम -इंटरनेट, मोबाइल फोन वापर आणि डिजिटल पेमेंट, तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील निर्णय घेण्यामध्ये स्त्री पुरुष संतुलन.
पायाभूत सुविधा या श्रेणीत भारत ६व्या क्रमांकावर असून, सक्षम धोरण राबविण्यात ४थ्या पण परिणाम पाहिल्यास १६व्या क्रमांकावर आहे. सर्वसाधारण एकूण क्रमवारीत भारत ९व्या क्रमांकावर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील तसेच इंटरनेट माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणात भारताने प्रगती केली आहे पण काही मोजता येण्या सारख्याच महिला तंत्रज्ञ पदावर काम करताना दिसतात. म्हणजेच एकूण तेवढा प्रभावी परिणाम दिसत नाही. प्रभावी परिणामासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. त्यासाठी गरजेचे आहे ते leading by example. आणि solutions by women for women

स्वतःमध्ये असलेल्या गुणाचा उपयोग आपल्या एखाद्या मैत्रिणीला होत असेल तर प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. WeResilient या महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या उपक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता. तुम्ही volunteer होऊन निरनिराळे कार्यक्रम आयोजित करायला मदत करू शकता, आपल्या माहितीतील काहीतरी वेगळे कार्य करणार्‍या महिलांबदल आम्हाला कळवू शकता, WeResilient साठी लेख, कविता, आलेले अनुभव लिहू शकता, आमच्या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होऊ शकता. चला आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण ही एक पाऊल पुढे टाकू. यासाठी आपण फक्त एक फॉर्म भरून या कार्यात सहभागी होऊ शकता.



जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

Happy Women's Day !!!
Read More

Saturday, January 14, 2023

World Logic Day

 


आज १४ जानेवारी, जागतिक तर्कशास्त्र दिवस. लगेच तुमच्या मनात विचार आला असेल की तर्कशास्त्र दिवस म्हणजे काय आणि १४ जानेवारीलाच का? तर्कसंगती महत्वाची.

अल्फ्रेड तार्स्की आणि कार्ट गोडेल या दोन महान गणितज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ यांच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस. आज अल्फ्रेड तार्स्की यांची जयंती आणि कार्ट गोडेल यांची पुण्यतिथी.UNESCO ने कौन्सिल फॉर फिलॉसॉफी अँड ह्युमन सायन्सेस (CIPSH) च्या सहकार्याने २०१९ मध्ये "जागतिक तर्कशास्त्र दिन" १४ जानेवारीला साजरा करण्याचे घोषित केला. तर्कशास्त्राच्या व्यावहारिक परिणामांबद्दल जागरूकता निर्मांण करणे हा यामागचा हेतू आहे. 

तार्स्की लहानपणापासूनच खूप हुशार. त्यांना रशियन, जर्मन, फ्रेंच व लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवशास्त्र या विषयाची आवड असल्याने तार्स्कींना त्यातच पदवी घ्यायची होती. वॉर्सा विद्यापीठातील प्राध्यापक लेसन्युस्की यांनी त्यांच्यातील गणित, तर्कशास्त्र या विषयातील बुद्धिमत्ता हेरली व तार्स्की यांना गणितातील पदवी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला शोध निबंध लिहिणाऱ्या तार्स्कींनी २२ व्या वर्षी डॉक्टरेट होऊन विद्यापीठातील सर्वात तरुण डॉक्टरेट होण्याचा मान मिळविला. गणितात संच सिद्धांत (Set Theory), बीजगणित, युक्लिडीय भूमिती, Decidable Theory तसेच तर्कशास्त्रात सत्याची व्याख्या, Deductive Methods यासारख्या विविध विषयांवर त्यांनी संशोधन करून महत्वाचे योगदान दिले. Tarski’s indefinability Theorem हे त्यांनी सिध्द केलेले प्रमेय, गणितीय तर्कशास्त्रात व formal semantics मध्ये महत्वपूर्ण मानले जाते. 

लहानपणी गोडेल सतत प्रश्न विचारत त्यामुळे ते "Mr. Why" नावाने ओळखले जात. पदव्युत्तर अभ्यासक्रमातील शिकवले जाणाऱ्या गणितात गोडेल यांनी वयाच्या १८ वर्षीच प्रावीण्य मिळविले होते. वयाच्या २३ व्या वर्षी ते डॉक्टरेट झाले. Completeness Theorem हे त्यांच्या प्रबंधातील मांडलेले महत्वपूर्ण प्रमेय. त्यानंतर दोन वर्षानी त्यांनी Incomplete Theorem मांडला. गणिताच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या तर्कशास्त्रीय व मूलभूत अशा प्रश्नांवरील त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. 

अनेक पुरस्कारांनी सन्मानित तार्स्की आणि गोडेल या दोन महान तर्कशास्त्रज्ञांना प्रणाम करून तर्कशास्त्राचे महत्व जाणून जागतिक तर्कशास्त्र दिवस साजरा करु.

World Logic Day, What is it ? Why to celebrate ? Logical questions. 

World logic day commemorates two great mathematicians and logicians, Alfred Tarski and Kurt Gödel. 
14 January is Alfred Tarski's birth anniversary and Kurt Gödel's death anniversary. In 2019, UNESCO in association with Council for Philosophy and Human Sciences (CIPSH) announced “World Logic Day” to be celebrated on 14th January. This intends to spread awareness about practical implications of logic.  

Tarski was very intelligent from childhood. He studied Russian, German, French and Latin languages. Tarsky wanted to pursue a degree in biology. A professor at the University of Warsaw, Lesniewski, saw his aptitude for mathematics and logic and encouraged Tarski to pursue a degree in mathematics. Tarsky, who wrote his first research paper at the age of 19, received doctorate at the age of 22, becoming the university's youngest doctorate. He made important contributions in various topics like Set Theory, Algebra, Euclidean Geometry, Decidable Theory, definition of truth in logic and Deductive Methods. Tarski's Indefinability theorem is considered to be important in mathematical logic and formal semantics. His emphasis on collaborative research led to many theories such as the Banach–Tarski Paradox. His 19 monographs in mathematics were published. 

As a child, Godel was known as "Mr. Why" because of his curiosity. Godel had already mastered the mathematics taught in the postgraduate course at the age of 18. He received his doctorate at the age of 23.Completeness Theorem is an important theorem presented in his thesis. Then after two years, he presented the Incomplete Theorem. His contributions to logical and fundamental questions arising in the context of mathematics are invaluable. 

Let's celebrate World Logic Day by paying tribute to the two great logicians, Tarsky and Gödel, and recognize the importance of logic.


 Snehal Kamalapur
Read More

Sunday, January 1, 2023

Different approach towards the goal and resolutions

 



२०२२ संपून सुरु होईल नवीन वर्ष २०२३. वर्षभरातील अनेक हव्या नकोशा घटनांच्या आठवणींबरोबरच पिंगा घालू लागतात ते ध्येय (goal) आणि संकल्प (Resolution) यासारखे शब्द, तशी जुनीच पण सध्या नव्याने वापरात येत असलेली bucketlist आणि त्याही पुढे जाऊन vision काय, mission काय. 

ध्येय कशाचे या वर्षाचे की जीवनाचे ? आणि ते कधी ठरवायचे ? ध्येय म्हणजे व्यावसायिक यश का ? स्वतःला काय मिळवायचे आहे याचे विधान म्हणजे ध्येय का ? स्वतःची महत्त्वाकांक्षा/ध्येय साध्य करण्यासाठी त्यामागे पळणे, त्यासाठीचा अट्टहास आणि त्यामध्ये काय मिळवले किंवा गमावले याकडे होणारे दुर्लक्ष. एखादे ध्येय ठेवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे नक्कीच चांगले पण ध्येयांच्या मागे पळून निराशेची भावना नको. 

काहीतरी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय म्हणजे संकल्प. Bucketlist म्हणजे आपल्या आयुष्यात (मृत्यूपूर्वी) करण्याच्या गोष्टी यामध्ये मृत्यूपूर्वी असा नकारार्थी भाव असला तरी bucketlist मधील गोष्टी आवडीच्या पण राहून गेलेल्या आणि स्वतःसाठी करायच्या असल्याने सकारात्मकता आहे. तर नवीन वर्षाकरिता केलेला संकल्प हा तुम्हाला काय बदलायचे आहे याचे विधान असल्याने कदाचित नाही आवडले तरी करायचे असा भाव असल्याने बऱ्याच वेळा सफल होताना दिसत नाही. 

ही संकल्पातील नकारात्मकता नको असेल तर थोडा या गोष्टींवर विचार करू या का ? 

ध्येय, संकल्प साध्य करताना छोटया गोष्टीतून आनंद शोधू या का ? 

अगदी उदाहरण घ्यायचे तर सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे लोक जेवढे जवळ आले दिसतात तेवढेच दूर गेलेलेही दिसतात. कनेक्ट होण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता करता कधी आपण त्याच्या आहारी जातो कळत नाही. आभासी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत रहातो. हे करत असताना फॉरवर्डेड संदेश आपण पुढे पाठवणे किंवा त्याला भरपूर ईमोजी टाकण्यात धन्यता मानतो. दिवसाचा बराच वेळ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, स्नॅपचॅट इ. वर खर्च केला जातो. पण एखाद्याने पाठविलेल्या वैयक्तिक संदेशाकडे मात्र दुर्लक्ष करतो. Likes आणि comments म्हणजे सर्व नाही हे जरी खरे असले तरी वैयक्तिक संदेशाला किंवा कॉलला जर उत्तर दिले किंवा वैयक्तिक संदेशाची प्रशंसा केली तर संदेश पाठविणारा नक्कीच खुश होईल. काय हरकत आहे अशा छोट्या कृतीतून दुसऱ्यांना आनंद देण्यात. इतरांना आनंदी करणे हे अधिक अर्थपूर्ण आहे, नाही का? 

आपल्याला सहज शक्य असलेल्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा आणि देण्याचा संकल्प करून तेच ध्येय ठेऊन bucketlist मध्ये समाविष्ट करू या.


It is the time to say goodbye to the year 2022 and welcome New Year 2023. Along with good and not so good memories of the past year some phrases like goals, resolutions, bucket list, vision and mission come to the foreground. 

Many questions are associated with this. Whether the goals should be set for a year or should they be smaller objectives contributing to overall goals of our life? What is the right time to set them? Should professional success be considered as a goal? or should it be something one wants to achieve? Should it be an ambitious target or easily achievable? Should we run very hard to achieve the goals and feel frustrated if we fail to achieve them? Well these are some important questions but there are no straight forward answers. 

A bucket list is a list of things one wants to accomplish in the lifetime. Although there is a negative connotation as it has to be before death, there is a positivity because the things in the bucket list are things you want to do but have left behind and want to do for yourself. Usually a New Year's resolution is a change statement which needs to be achieved even if you don't like it. This is perhaps a reason why most resolutions are not achieved. Let us keep the change (and the negativity associated with it) aside and have a different approach towards the resolutions. 

Let us try and find happiness in small things while achieving goals and resolutions? 

Social media has brought people closer and everyone is accessible. But at the same time there is a disconnect. When we use social media to connect and communicate, we never know how we get trapped into it. We try to find happiness in the virtual world. We often forward forwarded messages and send emojis in response to such forwards. We spend a lot of time using Facebook, Instagram, Twitter, YouTube, Snapchat etc. and tend to ignore personal messages sent by someone. Why not send a personal message instead of a like? Why not call the person and acknowledge the post. Why not meet a friend once in a while? 

Try and spread some happiness this year through such small acts.


 Snehal Kamalapur
Read More

Sunday, December 11, 2022

ऑस्ट्रेलिया : एक अनुभव

 


नुकताच काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना भेट देण्याचा योग आला. भेटी दरम्यान लक्षात आलेल्या या वेगळेपण स्पष्ट करणाऱ्या गोष्टी ! 

आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना जमिनीच्या पारंपरिक मालकांना आदरांजली वाहून किंवा मायभूमीप्रती आदर दर्शवून, (acknowledging the traditional owners of the land and paying respects to elders past and present) भूतकाळातील आणि वर्तमानातील ज्येष्ठांना आदर द्यायला ते विसरत नाहीत. कुशल कामगारांच्या आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असेल कदाचित, पण सर्वांना माणुसकीने वागवण्याचा गुणही आचरणात आणण्यासारखा आहे. त्याबरोबर दिसली ती स्त्रियांना ही तेवढाच आदर आणि मान सन्मान देण्याची पद्धत. महिला म्हणून प्रत्येकानी आम्हाला दिलेले महत्त्व खरंच सुखावून गेले. 

विद्यापीठ परिसरातील मोठ्या मॉलसारख्या कॉम्प्लेक्समध्ये मौजमजा करताना दिसणारे विद्यार्थी स्वतः बनवलेल्या वस्तू विकून दुसर्‍यांसाठी पैसे मिळवितानासुद्धा दिसतात . शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वावलंबनासाठी दुकानांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून बिनधास्त रहाण्याबरोबरच त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव दिसते. विद्यापीठ परिसरातील आरामदायक झोके, त्यावर अभ्यास करणाऱ्या किंवा नुसतेच मस्त पहुडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून नेहमीच्या चौकटी बाहेर जाऊन अशीही काही सुविधा असू शकते असा विचार आपण कधीच का केला नाही असा प्रश्न नक्कीच पडतो. 

आजूबाजूला अनेक देशातील वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांना पाहून वाटले किती बिनधास्त आहेत हे सगळे. आपल्या मनाला योग्य वाटेल ते करणारे- कपड्यांपासून ते वागणूकीपर्यंत. कोणाला काय वाटेल, बाकीचे काय म्हणतील याची पर्वा नाही. कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना खुष ठेवणे अवघड आहे किंवा प्रत्येकाची प्रतिक्रिया ही सर्वस्वी व्यक्तीच्या आकलनावर, बुद्धीवर अवलंबून आहे हे जणू त्यांना समजल्यासारखे दिसते. त्यामुळेच ते तसा अट्टहास करताना दिसत नाही. 

स्त्री पुरुष समानताही सर्व ठिकाणी लक्षात येण्यासारखी आहे. प्रशासकीय पदावरील प्रकुलगुरू लिसा, शाश्वत साहित्य संशोधन व तंत्रज्ञान केंद्राच्या (sustainable material research and technology center) संचालिका, संशोधक वीणा सहजवाला आणि माजी विरोधी पक्षनेतेपद भूषवून राजकारणातून निवृत्त होऊन आता ऑस्ट्रेलिया भारत व्यवसाय परिषदेच्या अध्यक्षा ज्युडी मॅके या काही महत्त्वाच्या पदावरील स्त्रिया. शहर पर्यटन मार्गदर्शक, सिडनी क्रिकेट मैदानावरील पर्यटन मार्गदर्शक गेल, विद्यापीठ भेट संयोजक ॲना व अंजली किंवा रात्री १० नंतरही पुरुषांच्या बरोबरीने रस्ता दुरुस्तीवर देखरेख करणाऱ्या स्त्रिया. अशा पुरुषांची मक्तेदारी म्हणून प्रचलित असलेल्या विविध प्रकारच्या कामांसाठी स्त्रियांची नेमणूक पाहायला मिळाली. या सर्व महिला आपली जबाबदारी अगदी समर्थपणे पेलताना दिसतात. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. 

खरंच कितीतरी संधी उपलब्ध आहेत पण आपण मात्र आपल्या भोवती भिंती घालून स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे असे वाटते.



Recently, I had the privilege of visiting three Australian universities. 

Cultures in all the countries are different and unique. Some of the differences I experienced during my short stay in the country are shared herewith. All public addresses start by acknowledging the traditional owners of the land and paying respect to the elders both in the past and the present, not forgetting to respect the people who helped build the structure. It may be due to lack of skilled workers and manpower, but the virtue of treating everyone with humanity is also worth practicing. 

Students were seen studying or relaxing on comfortable hammocks, in the university premises. One wonders why we never thought about such a facility. 

I came across people from different regions and countries all over the world living life like whatever they felt right without any worries- from clothes to behavior. No fear of people judging them or 'log kya kahenge'. It may be because they seem to understand that it is difficult to please everyone no matter how hard they try. So they make it a point to be free of all the stress resulting from trying to do so. 

Giving equal respect and dignity to women is credible. The importance given to us by everyone as women was a pleasant experience. Gender equality is also noticeable everywhere. Some women hold important positions like Vice-Chancellor Lisa on administrative post, researcher Veena Sahajwala, director of the sustainable material research and technology center, and Judy McKay, who retired from active politics and is now the president of the Australia India Business Council. City Tour Guide, Sydney Cricket Ground Tour Guide Gayle, University Visit Coordinator Anna and Anjali or even after 10 pm, women supervise road repairs along with men. Women were seen being employed for various types of work which were traditionally considered as a monopoly of men. All these women are fulfilling their responsibilities very efficiently. These are some representative examples. 

There are indeed so many opportunities available, we just need to look beyond the walls we have built around ourselves.
 

Snehal Kamalapur
Read More

Sunday, October 23, 2022

दीपोत्सव मांगल्याचा !

Happy Diwali
 

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया हा दीपोत्सव 🪔🪔🪔🪔🪔🪔

मंगलमय दिवाळी सुरू होते ती गोवत्स द्वादशी किंवा वसुबारसने. गाय वासरु वा कामधेनु म्हणजे मातृत्व. 
दीपावलीचा पहिला दीप सात्विकतेचा व ममतेचा 🪔 

धनत्रयोदशी धन्वंतरी पूजनाची. धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक, पहिले चिकित्सक. 
दीपावलीचा दुसरा दीप आरोग्याचा व निरोगी आयुष्याचा 🪔 
आरोग्यम् धनसंपदा ! 

अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी काम, क्रोध, अहंकार व राक्षसी वृत्तीच्या त्यागाची. 
ज्ञानाचा व समृद्धीचा तिसरा दीप 🪔 

अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाची. पैसे, सोने-नाणे या बरोबर पूजा होते ती अलक्ष्मीचा नाश करणाऱ्या केरसुणीची. 
 स्वच्छता व आर्थिक नियोजनाचा चौथा दीप 🪔

कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा विक्रम संवत्सराचा प्रारंभ. जल प्रदूषण, वायु प्रदूषण ते ध्वनि प्रदूषणात आपला काही प्रमाणात सहभाग आहेच. हेच विराट रूप धारण करून पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. 
जल, आकाश, धरती ही तीन पावले बटू वेशातील वामनाची. म्हणून  प्रदूषण मुक्तीचा व क्षमाशीलतेचा पाचवा दीप 🪔

कार्तिक शुक्ल द्वितीया  यमद्वितीया  किंवा भाऊबीज. द्वितीयेचा चंद्र, बीजेची कोर वृद्धी दाखवणारी. द्वेष व असूयेचा त्याग करून बंधुभाव जागृत करणारी भाऊबीज. 
 निर्भयतेचा व प्रेम संवर्धनाचा सहावा दीप 🪔 

ही दिपावली सात्विकता, ममता, आरोग्य, ज्ञान, समृद्धी, निर्मलता, समाधान, आर्थिक नियोजन, प्रदूषण मुक्ती, क्षमाशीलता, निर्भयता व प्रेम संवर्धनाचे हे दीप 🪔 आपल्या आयुष्यात आनंद व मांगल्याचा प्रकाश 💥घेऊन येवो हीच शुभेच्छा 🙏


सौ.  स्नेहल कमलापूर
Read More

Monday, September 26, 2022

नवरात्र : स्त्री शक्तीचा उत्सव

 

स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र



स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र. स्त्रीच्या विविध  रूपाप्रमाणेच नवरात्रातील देवीचीही वेगवेगळी रूपे. 

नऊ दिवसाच्या या नवदुर्गा - 
  • प्रबळ इच्छाशक्ती, निर्भयता व सामर्थ्याचे प्रतीक शैलपुत्री 
  • आनंद, समाधान देणारी, शांत, सुंदर व तेजस्वी ब्रह्मचारिणी 
  • शक्तिशाली व संयमी चंद्रघंटा 
  • एकाच वेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ताकदीने आणि सचोटीने सांभाळणारी कुष्मांडा 
  • आईचे प्रेमळ रूप आणि वेळ पडली तर मुलांसाठी आवश्यक ते सर्व करण्याचा निर्धार असलेली स्कंदमाता 
  • धैर्य व शौर्याचे रूप कात्यायनी 
  • निर्भय वृत्तीची कालरात्री 
  • बुद्धिमत्ता व आशेचे प्रतीक महागौरी 
  • स्वाभिमानी व अचूक निर्णयक्षमता असलेली सिद्धीदात्री

स्त्रियांमधील गुण वैशिष्ट्ये प्रतिकात्मकपणे साजरे करणारे नवरात्र. वाईटावर चांगल्याचा विजय व नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय सांंगणारे नवरात्र.  महिला सक्षमीकरणाचे  महत्व अधोरेखित करून स्त्रियांचा आदर करण्यास शिकवणारे नवरात्र. म्हणूनच मुलींचे योग्य पद्धतीने संगोपन करणे महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल असेल असे वाटते.




सौ.  स्नेहल कमलापूर
Read More

Thursday, August 18, 2022

Hard work, perseverance and dedication are key to success

News flashed "Among 1 lac 24 thousand 480 crore wealth of Indian women, Maharashtra remains at the top" on front page of Divya Marathi. Curiously I went through Kotak Private Banking Hurun Leading Wealthy Women list 2021. So I thought of sharing some interesting facts. In 2021, India’s 100 top active businesswomen, entrepreneurs and professionals are listed with cutoff of  300 crore as compared to  100 crore in 2020. The net wealth of these rich women is ₹ 4,16,970 crore which is 53% more than 2020. Out of these 22 featured in Hurun india and 8 in global rich list. 

Rich Women Individuals as per Industry 


 


85% women are from metro cities while 15% are from non metro cities. Around 24% of these rich women are from Maharashtra with 81% from Mumbai and 19% from Pune. 

Moto of this blog is –“Inspire and get inspired by others”. 

Age is no bar which is significant from the above survey. The average age being 55 ;  20% of them are  below 40. Youngest rich woman is Kanika Tekriwal of JetSetGo. She is a resident of Bhopal with a  net wealth of ₹ 420 crore. 31% are self made women and have 39% of combined wealth. 45% self made women are from Mumbai and New Delhi. New entry in rich self made women is Neha Narkhede with wealth of ₹ 13,380 crores. She is the co-founder of cloud company Confluent. 

Falguni Nayar of Nayaka is richest among self made women. She quit the job at Kotak Mahindra Group, leaving “ideal life”. She has built an empire by taking a risk at the age of 50. Nayaka is the first Indian unicorn startup led by woman to launch IPO, an inspiring story indeed!

 Follow your dreams

 
दिव्य मराठीच्या पहिल्या पानावर बातमी झळकली "१ लाख २४ हजार ४८० कोटींची संपत्ती निर्माण करणाऱ्या सर्वात  श्रीमंत महिलांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक". कुतूहलाने मी "कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून लीडिंग वेल्थी वूमन लिस्ट २०२१" पाहिली. हा अहवाल नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असू शकेल. २०२१ मध्ये भारतातील १०० सक्रिय महिला व्यावसायिक महिला, उद्योजक आणि व्यावसायिकांची यादी प्रकाशित केली. २०२० मध्ये या यादीत ₹ १०० कोटीवर उत्पन्न असलेल्या महिलांचा सहभाग होता तर २०२१ मध्ये या यादीत ₹ ३०० कोटी उत्पन्न असलेल्या स्त्रिया आहेत. या श्रीमंत महिलांची निव्वळ संपत्ती ₹ ४,१६,९७० कोटी आहे जी २०२० च्या तुलनेत ५३% जास्त आहे. यापैकी २२ महिलांनी हुरुनने प्रकाशित केलेल्या भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे आणि ८ जणी जागतिक श्रीमंतांच्या यादीत आहेत. 

उद्योगानुसार श्रीमंत महिला व्यक्ती



 ८५% महिला महानगरातील (मेट्रो शहरांतील) आहेत तर १५% इतर शहरांतील आहेत. यापैकी सुमारे २४% श्रीमंत महिला महाराष्ट्रातील असून त्यातील ८१% मुंबईतील आणि १९% पुण्यातील आहेत.


खरंच खूप प्रेरणा देणारी अशी ही आकडेवारी आहे. इथे कुठेही वयाचे बंधन नाही. या महिलांचे सरासरी वय ५५ असून २०% महिला या ४० वर्षाखालील आहेत. JetSetGo च्या कनिका टेकरीवाल ह्या सर्वात तरुण श्रीमंत भारतीय महिला आहेत . त्या भोपाळच्या रहिवासी असून त्यांची संपत्ती ₹ ४२० कोटी इतकी आहे. ३१% महिलांनी स्वतः व्यवसाय सुरु केलेला आहे त्यांची एकत्रित संपत्ती आहे या १०० महिलांच्या ३९% आहे. यातील ४५% महिला या मुंबई आणि दिल्लीमधील आहेत. या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवणाऱ्या महिलांमध्ये नेहा नारखेडे यांची संपत्ती आहे ₹ १३,३८० कोटी . 

स्वतःचा  व्यवसाय सुरु केलेल्या महिलांमध्ये Nayaka (नायका)च्या फाल्गुनी नायर सर्वात श्रीमंत आहे. कोटक महिंद्रातील सुखाची नोकरी सोडून धोका पत्करून वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. Nayaka ही IPO लॉन्च करणारी महिलांच्या नेतृत्वाखालील पहिली भारतीय युनिकॉर्न स्टार्टअप आहे. 
 
स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न  करा

#FollowYourDreams

Disclaimer : Information is based on Hurun report. Weresilient does not guarantee the accuracy or completeness of information


Dr. Snehal Kamalapur
Read More

Sunday, July 10, 2022

उपवास

आषाढी एकादशी आणि चातुर्मासाच्या निमित्ताने उपवासाविषयी माझी काही प्रामाणिक मतं मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...आहारशास्त्राचा अभ्यास करताना, लोकांचं आहार-समुपदेशन करताना काही प्रश्न पडत गेले. उपवास आणि उपवासाच्या दिवशीचं खाणं-पिणं कसं असावं हा त्यापैकीच एक. 

उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वेच्छेने काहीही न खाता-पिता राहणे. तसेच उपवास हा शब्द धार्मिक गोष्टी आणि परंपरा यांच्याशी सहसा निगडित असतो म्हणून आध्यात्मिक दृष्टीने विचार केल्यास उप – जवळ आणि वास – राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे असाही एक अर्थ असावा असं मला वाटतं. 

 उपवासाचे अनेक प्रकार दिसतात. कोणी उपवासाचे पदार्थ खाऊन-पिऊन उपवास करतात, कोणी काही न खाता-पिता करतात तर कोणी अगदी पाणीसुद्धा पीत नाहीत. तसेच कोणी आठवड्यातून एकदा, कोणी महिन्यातून किंवा वर्षातून एक-दोन वेळा तर कोणी सलग एक आठवडा, एक महिनादेखील उपवास करतात. उपासाची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु असे दिसून येते की जवळजवळ प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. योग्य पद्धतीने आणि नियमित उपवास केल्यास त्याचे फायदे निश्चितच दिसतील. 

सध्या आपण कसा उपवास करतो हे येतंय ना हळूहळू डोळ्यापुढे? बऱ्याच जणांकडे उपवासाच्या पदार्थांची किंवा सामान आणण्याची वेगळी यादीच तयार होते. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर, बटाट्याचे पापड, बटाट्याचा कीस, चिप्स, बटाट्याची उकडलेली भाजी, रताळ्याचे तुपातले काप, रताळ्याची खीर, साबुदाणा-बटाट्याचा तळलेला चिवडा शेंगदाण्याचे लाडू इ. यादी संपते आहे की नाही असं वाटायला लागलं आहे... तोंडाला पाणीही सुटलं आहे. हो ना? 

आता थोडा बारकाईने विचार करूया. बघा पटतंय का...या यादीतील जवळपास सगळेच पदार्थ पिष्टमय आहेत आणि भरपूर स्निग्धांश असलेले आहेत. यामुळे आपल्याला खूप अनावश्यक कॅलरीज मिळतात. म्हणजेच पोट भरतं पण शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. असं वरचेवर होऊ लागलं की शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. 

उपवासाच्या खऱ्या अर्थाच्या जवळ पोहोचण्यासाठी प्रथम मिताहार म्हणजे अगदी कमी प्रमाणात किंवा आवश्यक तेवढेच खावे. एकादशी आणि दुप्पट खाशी हा गमतीचा भाग म्हणून ठीक आहे पण खरोखर तसे होत नाही ना याची काळजी घ्यावी. उपवासाच्या दिवशी सुद्धा आहारात योग्य तेवढी प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असलेच पाहिजेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारची फळे, सुका मेवा, राजगिरा, काही भाज्या इ. पदार्थांमधून आपल्याला समतोल साधता येऊ शकतो. आणि अर्थातच याबरोबर योग्य प्रमाणात पाणी पिणेही आवश्यक आहे. 

ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर काही विकार असतील त्यांनी उपासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

आहारात योग्य ते बदल करून आपल्या धार्मिक रूढी आणि परंपरा जपतानाच आरोग्यही जपूया... 



 Dr. (Mrs) Suchit Kamalapur 
Consultant Dietitian
Read More

Thursday, June 23, 2022

Women Inventors and Innovators

 

आज २३ जून, आंतरराष्ट्रीय महिला अभियंता दिन. हा दिवस महिलांना अभियांत्रिकी क्षेत्रात यावे म्हणून  प्रोत्साहन देण्यासाठी आहे. 

Google वर अभियांत्रिकीमधील महिला याबद्दल शोधल्यावर. बऱ्याच प्रमाणात सांख्यिकीय (statistical) माहिती मिळाली. म्हणून उत्सुकतेने “जगातील महिलांनी लावलेले शोध” याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा असे लक्षात आले की किती तरी महत्त्वाचे शोध महिलांनी लावले आहेत आणि हे आपल्याला माहितीच नाहीत.

आपण वापरत असलेल्या कितीतरी वस्तू, उत्पादने आणि तंत्रज्ञान याची कल्पना, निर्मिती किंवा शोध हे महिलांनी लावले आहेत. आजच्या दिवसाचे औचित्य साधून चला तर आज अशाच काही महिला संशोधकांबद्दल जाणून घेऊ. 

गरज ही शोधाची जननी असे म्हणतात. त्यामुळेच कदाचित असे कितीतरी शोध, patent महिलांच्या नावावर आहेत. 
कागदाची पिशवी, डीशवॉशरची , लहान आइस्क्रीम फ्रीझर, गृह सुरक्षा प्रणाली, काळ्या महिलांसाठी डिझाइन केलेले पहिले सौंदर्य उत्पादन सारखे कितीतरी शोध हे महिलांच्या नावावर आहेत.

सारा गुप्पी, यांनी अनेक उपयुक्त गॅझेट्सचा शोध लावला. त्याच बरोबर पूल आणि रेल्वेमार्ग बांधण्याची आणि उभारण्याची एका नवीन पद्धतीचे पेटंट घेतले.

बेउलाह लुई हेन्रीच्या शोधाची यादी तर लांबलचक आहे - ती 110 शोध आणि 49 पेटंटसाठी ओळखली जाते 

आपल्या माहितीसाठी अजून काही प्रातिनिधिक उदाहरणे इथे दिली आहेत
शोधकर्ता शोध
जोसेफिन कोक्रेन(Josephine Cochrane) डिश वॉशर (Dish Washer)

मेरी व्हॅन ब्रिटन ब्राउन(Marie Van Brittan Brown) गृह सुरक्षा प्रणाली(Home Security System)

सारा बून (Sarah Boone) इस्त्री बोर्ड (Iron board)

मार्गारेट "मॅटी" नाइट (Margaret "Mattie" Knight) कागदी पिशवी (Paper Bag)

जॉय मंगानो (Joy Mangano) जादुई मोप (Magical Mop)

स्टेफनी क्वोलेक (Stephanie Kwolek) Kevlar, बुलेट-प्रूफ फायबर (Bullet-proof fiber)

फे देल मंडो (Fe del Mundo) सुधारित इनक्यूबेटर आणि कावीळ दूर करणाऱ्या उपकरणाचा शोध (Invention of an improved incubator and a jaundice relieving device)

मार्गारेट ए. विल्कॉक्स (Margaret A. Wilcox) कार हीटर (The Car Heater)

पॅट्रिशिया बाथ (Patricia Bath) लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Laser Cataract Surgery)

तबिता बॅबिट (Tabitha Babbitt) Circular saw

मारिया बीसले ( Maria Beasley) तराफा (Life raft)

अॅना कोनेली ( Anna Connelly) Fire escape

लॅटिटीला गीर (Letitia Geer) वैद्यकीय सिरिंज (Medical syringe)

मेरी अँडरसन (Mary Anderson) विंडशील्ड वाइपर (Windshield wiper)

विल्लेप्रेयूक्स पॉवर( Villepreux-Power) पहिले काचेचे मत्स्यालय (The first glass aquarium)

मेलिटा बेंट्झ (Melitta Bentz) कॉफी फिल्टर (Coffee Filter)

एव्हलिन बेरेझिन ( Evelyn Berezin) वर्ड प्रोसेसर (Word processor)

एलिझाबेथ मॅगी (Elizabeth Magie) पहिला मोनोपॉली खेळ (The First Monopoly Game)

इडा फोर्ब्स( Ida Forbes) इलेक्ट्रिक हॉट वॉटर हीटर (Electric hot water heater)

मॅरियन डोनोव्हन(Marion Donovan) डिस्पोजेबल डायपर (Disposable diaper)

अडा लव्हलेक (Ada Lovelac) पहिला संगणक अल्गोरिदम (First Computer Algorithm)

डॉ ग्रेस मरे हॉपर (Dr Grace Murray Hopper) COBOL चा शोध लावला (Invented COBOL)

हेडी लामर (Hedy Lamarr) Frequency-hopping technology


तुमच्या आजूबाजूला जर अशा व्यक्ती असतील तर त्यांना आनंद देण्यासाठी हा योग्य दिवस आहे. त्यांनी अभियांत्रिकीशी संबंधित क्षेत्रात असण्याची गरज नाही. आज महिलांच्या अशा कामगिरीबद्दल कौतुक करू या.


“International women in engineering” day is celebrated on 23rd June to encourage women to opt for engineering. Searching for the term women in engineering gives us a lot of statistical information. I came across very interesting inventions/innovations by women while searching curiously about inventions by women. 

Several items, products and technology which we use in our everyday life were developed or invented by women. There is a lot to celebrate from the various contributions made by women inventors. Let us celebrate and appreciate these women. 

The reason behind all these contributions might be because "need is the mother of invention". Women have invented many amazing things from Windshildwipers to disposable diapers, Paper bags to life rafts, small ice cream freezer to home security system, beauty products to rocket fuel. Let us thank the woman behind them! 

Sara Guppi invented many gadgets. She patented ‘a new mode of constructing and erecting bridges and railroads . She was the first woman ever to patent a bridge. 

Beulah Louise Henry was also called as “Lady Edison”. She has been credited with around 110 inventions and 49 patents to her name Here are some representative examples of all time inventions -
Inventor Invention

Josephine Cochrane Dish Washer

Marie Van Brittan Brown  Home Security System

Sarah Boone Iron board

Margaret "Mattie" Knight Paper Bag

Joy Mangano Magical Mop

Stephanie Kwolek Kevlar, Bullet-proof fiber

Fe del Mundo Invention of an improved incubator and a jaundice relieving device

Margaret A. Wilcox The Car Heater

Patricia Bath Laser Cataract Surgery

Tabitha Babbitt Circular saw

Maria Beasley Life raft

Anna Connelly Fire escape

Letitia Geer Medical syringe

Mary Anderson Windshield wiper

Villepreux-Power The first glass aquarium

Melitta Bentz Coffee Filter

Evelyn Berezin Word processor

Elizabeth Magie The First Monopoly Game

Ida Forbes Electric hot water heater

Marion Donovan Disposable diaper

Ada Lovelac First Computer Algorithm

Dr Grace Murray Hopper Invented COBOL

Hedy Lamarr Frequency-hopping technology


Today is the perfect day to appreciate the efforts of all these women and cheer them on. Do appreciate women around you who have contributed to science /society evn if they are not engineers by profession. 

 #InventorsandInnovatorswomen


Dr. Snehal Kamalapur
Read More