Friday, March 8, 2024

कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर

 

 

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक, डॉक्टर व अनेक मान्यवर यांच्यासमोर आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मायाशी माझी भेट झाली. या भेटीतून तिच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची बाजू समोर आली. एक अशिक्षित स्त्री काय करू शकते हे समजावे, तिचा संघर्ष सर्वांना समजावा, स्वतःजवळ काहीही नसताना कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर असा पल्ला गाठणाऱ्या मायाबद्दल महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला सांगण्याचा हा प्रयत्न. 

तेराव्या वर्षी लग्न, अल्लड वयात चौदाव्या वर्षी पहिले मूल आणि हे कमी की काय म्हणून अंगावर पडलेली आर्थिक जबाबदारी. एखादी सुशिक्षित व्यक्तीसुद्धा खचून गेली असती पण माया मात्र याला खंबीरपणे सामोरी गेली. शेजारपाजारी सगळ्या कचरा गोळा करणाऱ्या बायका त्यामुळे साहजिकच मायाने पण शहरात कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कसेबसे दिवसाला वीस रुपये मिळत. 

अलायन्स ऑफ वेस्ट पिकर (Aliance of Waste Picker, AIW) एक लाख कचरा वेचकांचे प्रतिनिधित्व करते. या अलायन्समधील कागद काच पत्र कष्टकरी पंचायत, पुणे ही एक सदस्य संस्था. या संस्थेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात मनापासून काम करत 60 कचरावेचक महिलांना ओळखपत्र मिळवून देत मायाने आपली खास ओळख निर्माण केली. 2010 मध्ये AIW ने भारतातून तीन कचरा वेचकांना तियानजिन, चीन येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यात मायाचा समावेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून आपली मतं मांडण्याची मिळालेली संधी तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांनी तिच्यावर जणू जादूच केली. निरक्षर असलो तरी जर आपल्या हातात कॅमेरा आला तर आपले प्रश्न आपण लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवू शकतो याची तिला जाणीव झाली. अभिव्यक्ती या स्वयंसेवी संस्थेकडून व्हिडिओग्राफीच्या मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तिचे जीवनच बदलून गेले.

आरोग्य, सामाजिक विषमता, पाणी प्रश्न, घरकाम, कचरावेचक महिलांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवरील माहितीपटांद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून उत्तम समुदाय पत्रकार म्हणून आपली ओळख मायाने निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता कोणतेही प्रशिक्षण न घेता मायाने कॅमेरा असिस्टंटपासून ते फिल्म मेकिंगपर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडल्या. 

मोहाची फुले म्हणजे दारू असे समीकरण पण त्यात औषधी गुणही तेवढेच आहेत. याच मोहाच्या फुलापासून लाडू, गुलाबजाम आणि एनर्जी पावडर अशी विविध उत्पादने तयार करण्यासाठी मायाने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांना एकत्र आणून आपली उत्पादने बाजारात आणली. 

विविध सामाजिक उपक्रमांसाठी मायाने श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या अंतर्गत वस्त्यांमध्ये जाऊन महिलांना एकत्र आणून डिस्कशन क्लब सारखे उपक्रम राबविले, शासनाशी सामाजिक प्रश्नांवर पत्रव्यवहार केला व यातून सामाजिक विकासाची चळवळ पुढे चालू ठेवली. 

गावकऱ्यांचे प्रश्न मांडता यावेत त्यासाठी मायाला आजूबाजूच्या गावांना भेटी देणे सोयीचे व्हावे, तिच्या सामाजिक कार्याला मदत व्हावी म्हणून सायरस पुनावाला यांनी तिला कार भेट देऊन तिचा सन्मान केला.   मायाच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत बेस्ट इम्पॅक्ट व्हिडिओ अवॉर्ड, राजमाता जिजाऊ सन्मान, नारी सन्मान, सावित्रीबाई फुले पुरस्कार, महिला गौरव पुरस्कार, नवदुर्गा सन्मान, भाई नावरेकर स्मृतिदिन विशेष सन्मान, कर्मयोगीनी पुरस्कार देत विविध संस्थांनी तिचा सन्मानही केला आहे. 

मायाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! शिक्षण घेण्याची तिची इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा ! 
नारीशक्तीस सलाम !!! Happy Women's Day!!!

I recently had a chance to meet Maya. She was speaking confidently in a cultural program attended by many entrepreneurs, physicians and renowned personalities. I had a brief chat with her to understand the challenging journey of an illiterate lady from a ragpicker to a journalist, social worker and a filmmaker. On the occasion of International Women's Day, I would like to share this inspiring story with you all. 
Maya got married when she was 13 and had her first child at the age of 14. Most of the ladies in her neighborhood were ragpickers. Maya also started as a rag picker to support her family. In those days, she earned hardly 20 rupees per day. 

Alliance of Waste Pickers (AIW) represents about 1 lakh ragpickers. Kaagad Kaach Patra Kashtakari Panchayat (KKPKP), Pune is a member organization of AIW. Maya started working with KKPKP’s Nashik Road office and was instrumental in arranging identity cards for 60 lady ragpickers. In 2010, AIW sponsored Maya and 2 other ragpickers to attend “UN Climate Change Conference” held at Tianjin, China. Representing India on a global platform and getting introduced to videography was a turning point in Maya’s life. She realized the power of camera & creating short films to effectively spread awareness about various problems to society & the government. On her return from the conference, she attended a training course in videography conducted by an NGO, Abhivyakti. Maya has created many short films addressing various problems faced by ragpickers and household workers. 

Encouraged by the response, she expanded her horizon to issues pertaining to health, social inequality and water scarcity. In this process she performed various roles from camera assistant to a filmmaker and established herself as a video journalist. 

Moh (Mahua) flowers are often seen as raw material for making Moh liquor. However Moh flowers have many medicinal properties. Maya encouraged tribal women from Peth Taluka in Nashik District to collect the flowers and prepare various products like Energy Powder and Sweets like Ladu & Gulabjamun. This has provided employment and opportunity to earn money to the tribal women. 

Maya has started Shramajivi Mahila Samajik Sanstha to protect the rights of unorganized women workers. The sanstha works towards better healthcare facilities for farmers, promoting quality education for their children and fostering skill development programs. 

Impressed by her initiative, Dr. Cyrus Poonawalla gifted Maya a car for easy commuting from village to village to help villagers around Nashik. Maya has received many awards like Best Impact Video Award, Rajmata Jijau Award, Nari Sanman, Savitribai Phule Award, Mahila Gaurav Award, Navdurga Award, Bhai Navrekar Memorial Award and Karmayogini Award to name a few. 

Best wishes for her future journey. May her wish to get formal education be fulfilled soon. 

Happy Women's Day!!!

#InvestInWomen


Dr. Snehal Kamalapur

0 comments:

Post a Comment

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment