Tuesday, June 1, 2021

Building resilience in children



Covid-19 pandemic has hugely raised the responsibilities of parents. In the present context because of restriction of movements; children have constrained access to socialization. The isolation caused by restriction in movement has resulted in children being overly sensitive to minor domestic issues. This is affecting their psycho-social well-being and development. We as parents wish our children to be forever happy. As a parent it is our responsibility to provide an enriching environment with happiness, love and understanding. Warm and nurturing relationships between children and parents is important in developing resilience.

Upbringing of a child has an impact on physical growth and brain development. A supportive home learning environment provided by parents is positively associated with children’s early achievements and well-being. 

All kids come across stress of varying degrees as they grow. It can be as simple as adapting to a new classroom or exam fear. It can be as severe as bullying by classmates /cyber bullies or abuse at home. Highest number of students suicides were recorded in 20191 in the past 25 years. Despite best efforts, parents can’t always protect kids from stress. So can we build resilience in children? Resilience will help children to cope up with challenges and bounce back. Building resilience in children is more than teaching life skills to children. Children learn from examples. So as a parent let us play a proactive role. we cannot shield our children from everything but these small efforts may help children to confront issues -

  • Avoid helicopter parenting
  • Praising accomplishments
  • Do not accommodate every demand
  • Boost your child's self-esteem
  • Foster a strong emotional connection
  • Create rules and expectations and apply them consistently
  • Develop problem-solving skills in children
  • Promote healthy risk-taking attitude
  • Talk about emotions and ask them to label emotions
  • Be a role model and discuss self-control by demonstrating coping skills
  • Read, Sing and dance together, talk about your day
  • Let them know that they can ask for help
  • Encourage your child to help others
  • Give them opportunities to think and act independently
  • Encourage physical activities or sports 
  • Nurture optimism
  • Let them talk
  • Nurture a growth mindset

Parents always try to provide an enriching environment and show selfless commitment to children. Global Day of Parents provides an opportunity to appreciate all parents.

“Appreciate all parents throughout the world” is the theme of global parents day 2021. 

Happy Parents day !!! 

UNICEF with CHILDLINE has published a manual. This manual has a toolkit for children of the age group of 6-19 years. The Manual, however, is intended to be open for use to all frontline workers and NGO partners to psycho-educate parents, caregivers and children2.

You can refer following article for parent, child and family resilience- https://www.jrf.org.uk/sites/default/files/jrf/migrated/files/parenting-resilience-children.pdf 


“आई मला खेळायला बाहेर जाऊ दे ना … “ घराघरातून ऐकू येणारं हे वाक्य. सध्या मुले घरात बंद आहेत, बाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत, शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊ शकत नसल्याने सोशलायझेशन बंद झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिक व भावनिक आरोग्यावर होत आहे.

सध्याच्या covid-19 परिस्थितीत पालक म्हणून आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या पद्धतीने मुलांना या परिस्थितीशी आनंदाने व सकारात्मकतेने जुळवून घेऊन सामना करायला तयार करणे गरजेचे आहे. पालक म्हणून मुलांचा आनंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी तसेच त्यांच्या जडण-घडणीत संगोपनाचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच मुलांना आनंदी, उत्साही व सकारात्मक वातावरणात वाढविले तर कोणत्याही परिस्थितीला ते सामोरे जाऊ शकतील.  

लहान मुलांना किंवा तरुणांना कसला आलाय ताण असा प्रश्न काहीजणांना पडू शकतो. नवीन मित्रांशी जुळवून घेणे, परीक्षेचा ताण किंवा मित्रांनी केलेली चेष्टा, cyber bullies किंवा घरातच त्यांच्याशी झालेले गैरवर्तन या आणि अशा कितीतरी गोष्टींचे ताण या मुलांवर आहेत. मागच्या २५ वर्षातल्या सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या २०१९1 मध्ये झाल्या. सध्याच्या परिस्थितीचा ताण आणि मनमोकळे बोलायला मित्र/मैत्रिणी आजूबाजूला नसल्याचा हा परिणाम असू शकतो. मुलांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आपण तयार करु शकतो. आपल्याला जर हे आपल्या वागणुकीतून दाखवून देता आले तर मुले ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करतील म्हणून या काही छोट्या गोष्टी करूया -
  • सतत मुलांच्या मागे मागे करू नका
  • मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल त्यांचे कौतुक करा
  • मुलांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणे गरजेचे नाही
  • मुलांचा स्वाभिमान कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा
  • मुलांबरोबरचे भावनिक नाते मजबूत करा
  • स्वयंशिस्तीसाठी नियम बनवून त्यांचे सातत्याने पालन करा
  • मुलांमध्ये समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करा
  • योग्य जोखीम घेण्याच्या वृत्तीस प्रोत्साहित करा
  • भावना व्यक्त करा आणि मुलांनाही त्यांच्या भावना व्यक्त करु द्या
  • परिस्थितीचा सामना कसा करायचा ते वागणुकीतून दाखवून द्या
  • एकत्रित वेळ घालवा
  • दुसऱ्याना मदत करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या
  • त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि वागण्याची संधी द्या
  • शारीरिक व्यायाम किंवा खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करा
  • त्यांच्यातील आशावाद वाढवा
  • त्यांना व्यक्त होऊ द्या
  • आपण ठरवले तर सर्वकाही शक्य आहे ही भावना जागवा

सर्वच पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काहीही करायला नेहमीच तयार असतात त्यामुळेच जगातील अशा सर्व पालकांचे कौतुक करणे हीच या वर्षीची कल्पना आहे.  

पालक दिनाच्या खूप शुभेच्छा  !!!

युनिसेफ आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या विद्यमाने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. हे पुस्तक पालकांना आपल्या मुलांशी भावनिक नातं दृढ करून त्यांच्याशी चांगला संवाद कसा साधावा यासाठी उपयोगी आहे. या पुस्तकातील ६ ते १९ वयोगटातील मुलांसाठी असलेले टूलकीट मुलांना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करते.  2

पालक, मुले व परिवाराला कोणत्या प्रकारचे ताण असतात, त्याचा सर्वांवर कसा परिणाम होतो आणि त्याच्याशी कसा सामना करू शकतो याचा संशोधन अहवाल वाचायचा असेल तर खालील लिंक वर तो उपलब्ध आहे - 
 https://www.jrf.org.uk/sites/default/files/jrf/migrated/files/parenting-resilience-children.pdf


Written by : Dr. Snehal Kamalapur


1.https://timesofindia.indiatimes.com/home/education/news/one-every-hour-at-10335-last-year-saw-most-student-suicides-in-25-years/articleshow/77969096.cms
2.https://www.unicef.org/india/media/3401/file/PSS-COVID19-Manual-ChildLine.pdf 

Location: Maharashtra, India India

Related Posts:

  • योग: एक परिपूर्ण जीवनशैली२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. … Read More
  • Blood donation is a reflection of our physical well-being   काही वर्षांपूर्वी माझ्या एका अगदी जवळच्या व्यक्तीला ऑपरेशन मधील गुंतागुंतीमुळे बरेच रक्त देण्याची गरज होती. रक्त पेढीतून (blood bank) … Read More
  • Understanding HPV Vaccination: Safeguarding Health TogetherAmayra is a fitness enthusiast in her mid-thirties. She balanced her job with a workout routine and a diet. She never missed her annual check-up. Bu… Read More
  • व्यक्त व्हा ! "किती आरडाओरडा करताय एकमेकांवर” "मीच का गप्प बसू, सारखीच चिडचिड असते ह्याची" "अग पण ओरडून काही उपयोग आहे का? शब्दाने शब्द वाढतो. आपल्या भाव… Read More
  • उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म  आपल्यापैकी बहुतेकांनी वदनी कवळ घेता... हा श्लोक ऐकला आहे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ही या श्लोकातील शेवटची ओळ. या ओळीत जो खोलवर अर्थ दडला आह… Read More

0 comments:

Post a Comment

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment