आजच्या आधुनिक आणि विज्ञानयुगात देखील जागतिक आरोग्य संघटनेला असा दिवस साजरा करण्याची, त्यावर सामाजिक प्रबोधन करण्याची गरज वाटते आहे हे वाचून आश्चर्य वाटले ना?
अन्न ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज. दूषित अन्नामध्ये अनेक अतिसूक्ष्म जीवाणू व विषाणू असतात जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. पोटात जाऊन त्याचे दुष्परिणाम झाल्यावरच त्यांचे अस्तित्व समजते. आजही जगभरात दूषित अन्नामुळे होणारे आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचं प्रमाण चिंताजनक आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो. यामुळेच अन्न सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची ठरते.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २०१८ सालापासून दरवर्षी ७ जून हा दिवस Food safety day म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश असा आहे की अन्न सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जावे, त्याकरिता ठोस उपाय केले जावेत, दूषित अन्नामुळे होणारे आजार टाळले जावेत आणि असे आजार झाले असतील तर त्यांचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार व्हावेत.
यावर्षीचा विषय आहे: Safe Food Now For A Healthy Tomorrow
अन्न सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वैयक्तिक पातळीवर आपण निश्चितच खालील गोष्टी पाळू शकतो.
- उत्तम प्रतीचे सामान (किराणा माल, भाज्या, फळे इ.) खरेदी करावे.
- सामान स्वच्छ व कोरड्या जागी साठवावे.
- स्वयंपाकासाठी स्वच्छ भांड्यांचा वापर करावा.
- स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छतेचे नियम पाळावे.
- शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी साठवावे.
- भाज्या, फळे, मांसाहारी पदार्थ वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुवावे.
- अन्नाचे तापमान योग्य ठेवावे. कोणते पदार्थ गरम खाल्ले जातात व कोणते पदार्थ गार खाल्ले जातात हे लक्षात घेऊन त्यायोग्य तापमान ठेवावे.
- जेवणाची भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे.
- जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
सुरक्षित अन्न खाण्याइतकेच आरोग्यासाठी उपयुक्त अन्न खाणेही महत्त्वाचे आहे. यासाठी आहारात योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व विविध भाज्या आणि फळे यांचा समावेश करावा.
वरकरणी सोपा वाटणारा विषय असला तरी याचे काळजीपूर्वक पालन केल्याने भविष्यात निश्चितच अनेक दीर्घकालीन फायदे मिळतील.
Isn’t it surprising that the World Health Organization needs to celebrate such a day in this new modern age?
Food is one of the basic needs of an individual. Contaminated food contains many bacteria and viruses which can’t be seen with naked eye. Their presence is detected only after people get sick upon consuming such food. The incidents of foodborne illnesses and deaths because of such illnesses are still a cause of worry throughout the world. Also such diseases can affect people of all age groups. That’s the reason food safety is extremely important.
The United Nations General Assembly has started to celebrate 7th Jun as Food Safety Day since year 2018. The aim of celebrating this day is to draw attention and inspire action to help prevent, detect and manage foodborne diseases.
The theme this year is: Safe Food Now For A healthy Tomorrow
Food safety is everybody’s responsibility. We can definitely follow a few things at individual level.
- Buy good quality grocery, fruits and vegetables.
- Store in a cool and dry place.
- Use clean utensils for cooking.
- The cook must maintain personal hygiene.
- Store vegetarian and non – vegetarian foods separately.
- Wash fruits, vegetables and meat thoroughly under running water.
- Keep food at the right temperature – The foods which are consumed cold should be kept at cold temperatures while the foods which are consumed hot should be kept hot.
- Keep food in clean utensils.
- Wash hands thoroughly before eating.
Eating safe food and eating healthy food, both are equally important. Have a balance of carbohydrates, proteins, fats, fruits and vegetables in your diet.
Investing in food today will reap both immediate and long term rewards.
Written by : Dr. Suchit Kamalapur, Dietitian
0 comments:
Post a Comment
Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment