Tuesday, June 15, 2021

Blood donation is a reflection of our physical well-being


 
काही वर्षांपूर्वी माझ्या एका अगदी जवळच्या व्यक्तीला ऑपरेशन मधील गुंतागुंतीमुळे बरेच रक्त देण्याची गरज होती. रक्त पेढीतून (blood bank) रक्त घेऊन ते देण्याची चर्चा घरात होती. रक्त पेढीतून रक्त घेऊन येणे म्हणजे बँकेतून पैसे काढण्याएवढी सोपी गोष्ट असती तर ! खरंतर आपण जसे बँकेत पैसे ठेवतो तसे ब्लड बँकेत रक्त दिल्याने मिळणारे कार्ड आपण गरजेच्यावेळी वापरू शकतो. अशा स्वयंसेवक रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचले कि आपल्याला त्याची किंमत कळते. अशाच स्वयंसेवक रक्तदात्यांना धन्यवाद देण्यासाठी १४ जूनला Blood donor day साजरा करतात. रक्तदानाचे महत्व, रक्तदान म्हणजेच जीवनदान हा संदेश लोकांना देणे हा ही याचा हेतू आहे. 

आपल्याकडे रक्ताचा तुटवडा नेहमीच जाणवतो. WHO च्या मध्ये २००६ च्या अभ्यासानुसार खालील विश्लेषण समोर आले.  
                      

रक्त उपलब्धतेबरोबर सुरक्षित रक्त गरजेचे आहे. सुरक्षित रक्तदानासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. जर हिपॅटायटीस, मलेरिया, ॲनिमिया, मधुमेह, क्षयरोग असलेल्या व्यक्तीचे रक्त किंवा योग्यप्रकारे खबरदारी न घेता जमा केलेले रक्त हे ही तेवढेच घातक असते. रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग हा १०% पेक्षा कमी आहे. याची अनेक कारणे पुढे येतात. ॲनिमिया तसेच उच्चरक्तदाब , मलेरिया, मधुमेह, क्षयरोग सारख्या व्याधींमुळे कमी महिला रक्तदान करताना दिसतात.  

खूपच विचार करण्यासारख्या काही गोष्टी २०१५-१६ च्या १५-४९ वयोगटातील महिलांच्या अभ्यासानुसार समोर आल्या आहेत - 
  • २२.९% भारतीय महिलांचा Body Mass Index(BMI) हा १८.५ पेक्षा म्हणजेच सामान्य श्रेणीच्या खाली आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २३.५% आहे. पण त्याच वेळी सामान्य श्रेणीच्या वर असलेल्या महिलांचे प्रमाण २०.७% आहे. 
  • ५३% भारतीय महिलांचे हिमोग्लोबिन सामान्य श्रेणीच्या खाली आहे. १४.८% भारतीय महिला उच्चरक्तदाबाने त्रस्त आहेत. महाराष्ट्रात हे प्रमाण १७.७% आहे. 
  • १.९%भारतीय महिलांना दमा तर ५.८% महिलांना मधुमेह आहे. 
World donor day च्या निमित्ताने आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देऊन Give blood and keep the world beating हे स्लोगन आचरणात आणू या.

A few years ago one of my relatives developed complications during a surgery which required a large amount of blood. So we approached a blood bank. Hope it be as easy as withdrawing money from a bank. World Blood Donor Day is observed on 14th June to thank voluntary, unpaid blood donors and to create public awareness of the need for safe blood, blood products.

We observe blood shortage in India every year. Patients do not have access to blood when needed. 

As per World Health Organization study in 2006 following is the analysis-
 


Safe blood when given is expected to benefit a patient without causing any adverse effects. It should be free from any infectious agents. Many people are exposed to avoidable, life-threatening risks through the transfusion of unsafe blood. Blood is also an effective means of transmitting HIV, hepatitis B, hepatitis C, malaria etc. Inadequate blood supply is costly but an unsafe blood supply is even more costly. Women donors are below 10% of total donors. Women are not able to donate the blood because of anemia, hypertension, malaria, diabetes, tuberculosis etc. 

As per the study conducted in 2015-16 on the age group of 15-49 following are observation – 
  • Body Mass Index(BMI) less than 18.5 is observed in 22.9% of women in India while in Maharashtra it is 23.5% . This is below normal range. 
  • 53% of women have hemoglobin below normal range.
  • 14.8% of Indian women are suffering from hypertension in Maharashtra this is 17.7% .
  • 1.9% of Indian women are suffering from Asthma and 5.8% are having diabetes. 
Let us focus physical fitness and follow WHO slogan on Give blood and keep the world beating. 

 Donate your blood for a reason and let the reason be life

Written by : Dr. Snehal Kamalapur

Location: Maharashtra, India India

Related Posts:

  • रिफ्रेश बटणाच्या शोधात  २०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आ… Read More
  • कचरावेचक ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर   एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक, डॉक्टर व अनेक मान्यवर यांच्यासमोर आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मायाशी माझी भेट झाली. या भेटीतून तिच्या… Read More
  • मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी  स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या… Read More
  • गौराईआज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बो… Read More
  • नवरात्र : स्त्री शक्तीचा उत्सव   स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्र. स्त्रीच्या विविध  रूपाप्रमाणेच नवरात्रातील देवीचीही वेगवेगळी रूपे. नऊ दिवसाच्या या नवदुर्गा - … Read More

1 comment:

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment