Tuesday, March 8, 2022

व्यक्त व्हा !

"किती आरडाओरडा करताय एकमेकांवर” 
"मीच का गप्प बसू, सारखीच चिडचिड असते ह्याची" 
"अग पण ओरडून काही उपयोग आहे का? शब्दाने शब्द वाढतो. आपल्या भावना व्यक्त करताना दुसर्‍यांच्या दुखवण्यात काय अर्थ आहे. शांतपणे बोलून व्यक्त होऊच शकतो की आपण ."
भावना व्यक्त करणे म्हणजे प्रतिक्रिया देणे नव्हे. आनंद, दुःख, राग, प्रेम, आश्चर्य, भीती या भावना व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. बर्‍याच वेळा या तर्कसंगत असतीलच असे नाही.  

मागच्या दोन वर्षात करोनाने आपल्याला खूप काही शिकवले. भरभरून मदत देणाऱ्या पासून ते एखाद्यावर बहिष्कार टाकण्यापर्यंत, एकत्र असल्याने एकमेकांच्या जवळ येण्यापासून ते एकमेकांपासून दूर जाण्यापर्यंत, नोकरी जाण्यापासून ते कुटुंबाला एकत्रित आनंद घेता  येत नाही म्हणून नोकरी सोडण्यापर्यँत, ग्रेट डिप्रेशन पासून ते ग्रेट रेसिग्नेशन  पर्यंत, जास्तीत जास्त बाहेर राहण्यापासून ते पूर्ण वेळ घरी राहण्यापर्यंत.  या सर्वांचा स्त्रियांच्या मानसिकतेत परिणाम झाल्याचे आकडे सांगतात. 

माझ्या मते भावना व्यक्त करण्याची पद्धत ही स्त्री आणि पुरुषांची वेगवेगळी असल्याने असेल कदाचित. किती पुरुषांना तुम्ही रडताना पाहिले? रडणे म्हणजे दुर्बलता. एखादा मुलगा रडला तर तू मुलगी आहेस का असे म्हणून चिडवणारे  कमी नाहीत. अगदी बायकांचीही, लागल्या रडायला म्हणून हेटाळणी होतेच की.   आपली भावना व्यक्त करण्याची तर्‍हा प्रत्येकीची वेगळी. काही  बोलून व्यक्त होतील, काही लेखणीतून, काही आरडाओरड करतील तर काही  रडून मोकळ्या होतील. पण काही अगदी ' तुम इतना जो मुस्कुरा रही हो क्या गम है जिसको छिपा रहे हो'  कैफ़ी आजमी यांनी लिहिलेल्या या गझले सारख्या आपल्या भावना लपवून ठेवतात. आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या भावना लपवण्याचा प्रयत्न का ? 

अगदी रडून का होईना आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या स्त्रिया आपल्या भावना दडपण्याचा प्रयत्न स्त्रिया व्यसनाच्या आहारी जाऊन तर करत नाहीत ना? कदाचित त्यामुळेच की काय मुक्तांगणात स्त्रियांसाठी व्यसन मुक्तीची सोय करावी लागत आहे. मुक्ता पुणतांबेकर यांच्या लेखातील विचार खरंच काळजी वाटण्यासारखा आहे.  

तणावात राहून आलेली अस्वस्थता, बेचैनीत राहून होणारा भावनिक कोंडमारा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. मदत मागणे किंवा कोणापाशी मन मोकळे करणे हे कमीपणाचे  किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही. 

यासाठी आपल्याला काही छोट्या गोष्टी  करता येतील -  
  • नकारात्मक विचारांना वाट करून देण्यासाठी व्यक्त होणे  
  • प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणे  
  • एखादी कला किंवा छंद जोपासणे 
  • जमत नसेल तर नाही म्हणायला शिकणे 
  • सर्व गोष्टींचे विश्लेषण करून ध्येय ठरवणे  
  • स्वतःला प्राधान्य व वेळ देणे  

व्यक्त व्हा , आनंदी रहा!!! 
 
#भावना  
#ExpressEmotions 
#Women's day 



डॉ. स्नेहल कमलापूर

Related Posts:

  • रिफ्रेश बटणाच्या शोधात  २०२३ संपून २०२४ सुरू होईल. २०२३ वर्ष नेहमीप्रमाणेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं. अनेक प्रश्न अजूनही मनात आहेतच. उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालूच आ… Read More
  • योग: एक परिपूर्ण जीवनशैली२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. … Read More
  • गौराईआज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बो… Read More
  • Different approach towards the goal and resolutions  २०२२ संपून सुरु होईल नवीन वर्ष २०२३. वर्षभरातील अनेक हव्या नकोशा घटनांच्या आठवणींबरोबरच पिंगा घालू लागतात ते ध्येय (goal) आणि संकल्प (Resolut… Read More
  • मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी  स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या… Read More

3 comments:

Thank you !!!
Kindly Subscribe to blog and post a comment